पणजी; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात सत्ता स्थापन केल्यास ३०० युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल असे आश्वासन दिले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज हे आश्वासन दिले.
पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद केजरीवाल यांनी स्वतःच्या फायद्यासाठी पक्षांतर केलेल्या आमदारांबद्दल नाराजी व्यक्त केली.
अधिक वाचा :
आप राजकारणात स्वच्छता आणणार, असे वचन त्यांनी गोमंतकीयांना दिले. आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असा दावा त्यांनी केला.
केजरीवाल म्हणाले, फेब्रुवारी २०२२ मध्ये म्हणजेच येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष निवडून आल्यास प्रत्येक कुटुंबाला दरमहा ३०० युनिट पर्यंत वीज मोफत मिळेल. यातून ८७ टक्के गोमंतकीयांना शून्य वीज बिल येईल.
आपचे सरकार आल्यास लोकांची जुनी बिले माफ केली जातील. त्याचबरोबर २४ तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी वीज वितरण व्यवस्थेत आवश्यक ते बदल करणे.
अधिक वाचा :
त्याशिवाय शेतकर्यांना शेतीसाठी मोफत वीज दिली जाईल, अशी घोषणा देखील केजरीवाल यांनी केली.
गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस व अन्य पक्ष सोडलेल्या आमदारांवर भाजपमध्ये सामील झाल्याबद्दल अरविंद केजरीवाल यांनी टीका केली.
ज्यांना विरोधी पक्षात असले पाहिजे होते, ते आता राज्य करीत आहेत आणि ज्यांना सत्तेत राहायला लोकांनी मत दिले होते, ते सध्या विरोधी पक्षात आहेत. गोव्याला बदल हवा आहे. लोकांना स्वच्छ राजकारण हवे, असेही त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेनंतर केजरीवाल यांनी गोव्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी आपचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे, अॅड. सुरेल तिळवे, प्रतिमा कुतींन्हो यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
पाहा फोटोज्