Latest

WHO : ‘कोवॅक्सिन’साठी भारत बायोटेककडे डब्ल्यूएचओने मागितलं स्पष्टीकरण

backup backup

जिनिव्हा, पुढारी ऑनलाईन : जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तांत्रिक सल्लागारांच्या समितीने मंगळवारी भारतात तयार झालेली स्वदेशी 'कोवॅक्सिन'च्या आपतकालीन उपयोगाच्या सूचीमध्ये सहभागी करण्यासाठी अंतिम 'नफा-जोखीम मूल्यांकन'च्या कारणावरून भारत बायोटेक 'अतिरिक्त स्पष्टीकरण' मागितलं.

डब्ल्यूएचओची तांत्रिक सल्लागारांची समिती अंतिम मूल्यांकनासाठी ३ नोव्हेंबरला बैठक घेण्याची शक्यता आहे. कोवॅक्सिनची निर्मिती करणाऱ्या हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीच्या लसीला उपयोगाच्या सूचीमध्ये सामील करण्यासाठी डब्ल्यूएचओने (WHO) ईओआयकडे प्रस्तुत केलेली होती.

तांत्रिक सल्लागारांनी मंगळवारी भारताच्या स्वदेशी असणाऱ्या लसीला आपतकालीन उपयोगाच्या सूचीमध्ये अंतर्भूत करण्यासाठी कोवॅक्सिनच्या आकड्याची समीक्षा करण्यात आली. यासंदर्भात डब्ल्युएचओने माध्यमांना असं सांगितलं आहे की, "तांत्रिक सल्लागारांच्या समूहाकडून मंडळवारी बैठक घेण्यात आली. त्यामध्ये लसीच्या वैश्विक वापराला डोळ्यांसमोर ठेवून अंतिम नफा-जोखीम मूल्यांकनासाठी संबंधित कंपनीकडून स्पष्टीकरण मागण्याची गरज आहे."

डब्ल्यूएचओकडून अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की, "या सल्लागारांना कंपनीकडून आठवडा अखेर मिळण्याची शक्यता आहे. ज्यावर पुन्हा ३ नोव्हेंबरला बैठक पार पडण्याची शक्यता आहे."

पहा व्हिडीओ : माझ्या नवऱ्याला प्लॅनिंग करून फसवण्याचा प्रयत्न – क्रांती रेडक

हे वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT