विश्वसंचार

६४ किलो वजन असलेल्या महिलेला उचलले दाढीने

backup backup

माणसाची दाढी काय कामाची? असे जर विचारले तर याचे जरा उत्तर देणे अवघडच ठरेल. मात्र, याच दाढीच्या मदतीने वजन उचलून एका नव्या विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली आहे.

एंटानास कोेंट्रीमास नावाच्या एका माणसाने केवळ आपल्या दाढीच्या मदतीने तब्बल 64 किलो वजन असलेल्या महिलेला अलगद उचलून विश्वविक्रमाची नोंद केली. त्याच्या या कामगिरीची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्'मध्ये झाली आहे. यासंबंधीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

एंटानास कोेंट्रीमास या व्यक्तीने दाढीने जास्तीत जास्त वजन उचलण्याचा हा विक्रम केला. त्याने आपल्या दाढीने तब्बल 63.80 किलो वजन असलेल्या माहिलेला उचलले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने शेअर केलेल्या व्हिडीओनुसार एका महिलेला हॉर्नेटच्या मदतीने कोेंट्रीमासच्या दाढीला बांधले आहे

. सुरुवातीला महिलेला उचलणे अत्यंत अवघड वाटत होते. मात्र, यामध्ये कोेंट्रीमासने यश मिळविले.
इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आल्यानंतर हा व्हिडीओ आतापर्यंत 10 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. कोेंट्रीमासची मजबूत दाढी पाहून लोकही आश्चर्यचकित होतात.

त्यामुळे लोक त्याला दाढी मजबूत करण्यासाठी कोणते प्रोडक्ट वापरता? असा प्रश्न विचारतात. कोेंट्रीमासने हा विक्रम 26 जून 2013 रोजी केलेला असला तरी तो आज आठ वर्षांनंतरही अबाधित आहे. हा विक्रम मोडण्याचा अनेकांनी प्रयत्न केला; पण त्यांना यश
मिळाले नाही.

SCROLL FOR NEXT