'भावा तुझा नंबर दे'..मनिषने केली विनंती; कपिल शर्मा याने दिलं थेट निमंत्रण | पुढारी

'भावा तुझा नंबर दे'..मनिषने केली विनंती; कपिल शर्मा याने दिलं थेट निमंत्रण

पुढारी ऑनलाईन :

छोट्या पडद्यावरील द कपिल शर्मा या कॉमेडी शोची लोकप्रियता किती तुफान आहे, हे एका घटनेमुळे दिसून आले आहे. या शोमध्ये कपिल शर्मा याच्यासह सेलिब्रिटींना समोरून पाहण्याची अनेकांची इच्छा असते. म्हणूनचं अनेकजण तिकिट काढून या शोमध्ये सहभागी होतात. काही मोजक्या जणांना शाेमध्‍ये सहभागी हाेण्‍याची संधी मिळते. अशीच एकाने आपली इच्छा बोलून दाखवली. यानंतर त्‍याला थेट कॉमेडियन कपिलचं निमंत्रण आलं. पाहुया नेमकं काय घडलं.

मनिष कुमार हे आपल्या चिमुकलीसह मुंबई फिरायला आले. तेथे त्यांनी मरीन ड्राईव्हवर एक सुंदर फोटो काढला. या फोटोमध्ये मनिष यांच्यासोबत त्यांची मुलगीही दिसते. कपिलने मनिष यांचा फोटो पाहून त्यांचा ट्विटरवरील मेसेज वाचला आणि त्यांना थेट आपल्या शोमध्ये येण्यासाठी निमंत्रण दिलं.

Nawab Malik : यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede?, नवाब मलिकांकडून आणखी एक गौप्यस्फोट

मनिष यांनी लिहिलंय- २३ नोव्हेंबर रोजी मुंबईतून गावी निघणार आहोत. तत्पूर्वी, माझ्या लेकीला आपला शो लाईव्ह पाहायची खूप इच्छा आहे. माझ्या मुलीची ही पहिलीच मुंबईत ट्रीप असून तिला तुमचा शो खूप आवडतो. माझ्या मुलीला आणि कुटुंबास आपल्या शोमध्ये सहभागी होण्याची संधी द्यावी, अशी विनंतीही त्‍यांनी केली हाेती.

मनिष यांच्या ट्विटला कपिलने तत्काळ उत्तर देत थेट शोमध्ये सहभागी होण्यास सांगितले. कपिल म्हणाला- भावा, आम्ही उद्याच शूटींग करत आहोत. आपण आपला कॉन्टॅक्ट नंबर द्यावा. माझी टीम आपल्याशी संपर्क साधून शोमध्ये सहभागी करून घेईल.


त्यामुळे, कपिलच्या शोमध्ये मनिष यांचं स्वागत कसं होणार? या शोमध्ये मनिष सहभागी होणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. कपिलने एका चाहत्याच्या विनंतीला मान देऊन त्याची इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न केला, याबद्दलही कपिलचे कौतुक होतेय.

हेही वाचलं का ?

 

Back to top button