40 वर्षांत पक्ष्यांची संख्या लाखोंनी घटल | पुढारी

40 वर्षांत पक्ष्यांची संख्या लाखोंनी घटल

“लंडन :” image=”http://”][/author]

जलवायू परिवर्तनामुळे पृथ्वीवर राहात असलेल्या जीवांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. या जीवांच्या राहण्यावर, खाण्यावर इतकेच नव्हे तर एकमेकांशी असलेल्या संबंंधावर व वागण्यावरही प्रभाव पडत आहे. याला मानव आणि पक्षीही अपवाद नाहीत

. एक काळ असा होता की, पक्षी आणि माणूस यांच्यात कोणत्याची निर्भरतेविना घनिष्ठ संबंध असायचा. मात्र, जलवायू परिवर्तनामुळे या संबंधांवर परिणाम होऊ लागला आहे. गेल्या 40 वर्षांत युरोपमधून लाखो पक्ष्यांचा चिवचिवाट कमी झाला आहे

.
पक्ष्यांची संख्या घटण्यामागचे प्रमुख कारण म्हणचे मानवी हस्तक्षेपामुळे कमी होत असलेला नैसर्गिक अधिवास. मानवी हस्तक्षेप आणि जलवायू परिवर्तनामुळे 1980 पासून युरोपमधील पक्षी सातत्याने गायब होत आहेत. गेल्या 40 वर्षांत युरोपमधून नाहीशा झालेल्या पक्ष्यांची संख्या तब्बल 62 कोटींपर्यंत पोहोचली आहे.

दरम्यान, रॉयल सोसायटी फॉर प्रोटेक्शन बर्डस्च्या रिचर्ड ग्रेगरी यांच्या मते, चिंतेची बाब म्हणजे हे पक्षी गायब होण्याकडे कोणाचेच ध्यान नाही. हे सर्वकाही अत्यंत स्पष्टपणे होत नसून हे पक्षी सावकाशपणे परिदृश्यापासून नाहीसे होत आहेत.

अत्यंत आकर्षक दिसणार्‍या कबुतरांची संख्या आता 60 टक्केच असून, ते 7.5 कोटीपर्यंत घटले आहेत. असे जवळ जवळ सर्वच पक्ष्यांबाबत होत आहे. यामुळे हे कोठेतरी रोखण्याची गरज निर्माण झाली आहे.

Back to top button