शास्त्रज्ञांनी उलगडले झाडांच्या विकासाचे गूढ | पुढारी

शास्त्रज्ञांनी उलगडले झाडांच्या विकासाचे गूढ

“वॉशिंग्टन : ” image=”http://”][/author]

‘ऑक्सिन’ला एक खास प्रकारचा अणू मानला जातो. हा अणू म्हणजे तत्त्व आहे. हेच तत्त्व एका कोशिकेला संपूर्ण झाडात बदलण्याच्या प्रक्रियेस जबाबदार ठरते. या तत्त्वामुळेच एका कोशिकेचे झाडात रूपांतर होण्याची प्रक्रिया पूर्ण होते. याबद्दल शास्त्रज्ञांनी माहीत होते; पण ‘ऑक्सिन’ हा विशेष प्रकाचा अणू नेमके कसे काम करतो, याचे गूढ गेल्या 50 वर्षांपासून त्यांना उलगडले नव्हते. आता मात्र यामध्ये त्यांना यश मिळाले आहे.

निसर्गात अशा अनेक घटना अथवा प्रक्रिया घडतात की, त्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करत असतात. असाच एक प्रश्न गेल्या पाच दशकांपासून शास्त्रज्ञांना सतावत होता. अमेरिकेतील ‘युसी रिवरसाईड’च्या संशोधकांच्या पथकाने ऑक्सिन हा अणू एका कोशिकेचे झाडात कसे रूपांतर करतो, याचे गूढ उलगडले. या ऑक्सिनवरच सर्व झाडे अवलंबून असतात.

शास्त्रज्ञांच्या मते, ऑक्सिन म्हणजे विकास. हा अणू झाडांच्या विकासात दोन प्रकारे मदत करत असतो. झाडांच्या कोशिका या आवरणाच्या आत असतात, त्यांना कोशिकाभिती अथवा सेल वॉल असेही म्हटले जाते.

तसेच प्राथमिक आवरणाचे तीन प्रमुख घटक असतात. त्यांना सेल्यूलोज, हेमी सेल्यूलोज आणि पेक्टिन असे म्हटले जाते. हे घटक झाडाला मजबूत आधार देणे, तसेच विकास व वाढीसाठी काम करतात. यामुळेच कोशिकेचे झाडात परिवर्तन होण्यास मदत मिळते.

Back to top button