Latest

David Warner : डेव्हिड वॉर्नरचा अलू अर्जुनवाला अंदाज ! कोहली म्‍हणाला, मित्रा बरा आहेस ना?

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

ऑस्‍ट्रेलियाचा दिग्‍गज खेळाडू डेव्हिड वॉर्नरने (David Warner) सोशल मीडियावरून अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. यामुळे नेहमीच तो आपल्‍या चाहत्‍यांचे मन जिंकण्यात यशस्‍वी होतो. खासकरून भारतीय चाहत्‍यांसाठी तो काही ना काही इंस्‍टाग्रामवर पोस्‍ट करत असतो. ज्‍याला चाहत्‍यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. यावेळी वॉर्नरने पुन्हा एकदा इंस्‍टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्‍ट केला आहे.

या व्हिडिओ मध्ये तो दाक्षिणात्‍य अभिनेता अलू अर्जुन (South famous actor Allu Arjun) च्या अंदाजात ॲक्‍शन आणि डान्स करताना दिसत आहे. वॉर्नरने अल्‍लू अर्जुनचा येणारा चित्रपट 'पुष्‍पा' च्या क्‍लिप्सवर स्‍वत: ला त्‍याच्या जागी ठेवून हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्‍यावर चाहते कमेंट करत आहेत. इतकच काय वॉर्नरचा हा विनोदी व्हिडिओ पाहून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला देखील प्रतिक्रिया देण्यावाचून स्‍वत:ला रोखू शकला नाही. विराट कोहली (Viirat kohli react on Warner) ने यावर कमेंट केली. ज्‍यामध्ये तो 'मित्रा तु ठिक आहेस ना…' असे विचारत आहे.

या आधीही कोहलीने वॉर्नरच्या पोस्‍टवर अनेकवेळा कमेंट केली आहे. डेव्हिड वॉर्नर सध्या ऍशेस खेळत आहे. अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात वॉर्नरची बॅट जबरदस्त चालली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात वॉर्नरने 94 धावा करत आपल्या फॉर्मबद्दल टीकाकारांना पुन्हा उत्तर दिले आहे. मात्र, कसोटी सामन्यादरम्यान वॉर्नरला दुखापत झाली होती. त्यामुळे तो दुसऱ्या डावात फलंदाजीला येऊ शकला नाही. तसे, चाहत्यांना आशा आहे की अॅशेसच्या दुसर्‍या कसोटीपूर्वी डेव्हिड वॉर्नर तंदुरुस्त होईल आणि पुन्हा त्याचा अप्रतिम खेळ खेळपट्टीवर दाखवताना दिसेल.

टी-२० वर्ल्ड कप मध्ये वॉर्नरने जबरदस्‍त पुनर्रागमण केले होतं. या शिवाय वॉर्नरची नजर आयपीएल ऑक्‍शनवर देखील आहे. वॉर्नरला हैद्राबादने रिलीज केले आहे. त्‍या पार्श्वभूमीवर यंदा आयपीएल मध्ये वॉर्नर कोणत्‍या टिम मध्ये सामील होतो हे पाहणे औत्‍स्‍युक्‍याचे ठरेल.

हे वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT