

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर हँडल हॅक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. (PM Modi Twitter Account) पीएम मोदींचे ट्विटर हँडल हॅक करून क्रिप्टोकरन्सी बाबत माहिती देण्यात आली. ही बाब पीएमओच्या लक्षात आल्यावर ट्विटरला माहिती देत पीएमओचे ट्विटर हँडल पुन्हा सुरळीत केल्याचे सांगण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले. @narendramodi अशा नावाने तयार केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारताने बिटकॉइनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता दिली आहे. सरकारने अधिकृतपणे ५०० BTC विकत घेतले आहे.
दरम्यान आम्ही ते देशातील सर्व नागरिकांना वितरित करत आहे. जल्दी करें india…… भविष्य आज आया है!' अशा आशयाचे ट्विट करत हॅक केल्याचे समोर आले आहे. (PM Modi Twitter Account)
दरम्यान अवघ्या दोन मिनिटांत हे ट्विट डिलीट करण्यात आले. लगेच दुसरे ट्विट अवघ्या दोन मिनीटांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले.
पीएमओने ट्विट करून मोदींचे खाते काही काळासाठी हॅक झाल्याची माहिती दिली. या कालावधीत केलेले कोणत्याही ट्विटवर विश्वास ठेऊ नका असे पीएमओकडून सांगण्यात आले.