सोलापूर ः संदीप येरवडे :कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये एचआयव्हीबाधितांची तपासणी करता आली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील एचआव्हीबाधितांची तपासणी निम्म्यावर आली आहे. सोलापूर जिल्ह्यात सद्य परिस्थितीत 12 हजार एचआव्हीबाधित रुग्ण आहेत.
एचआयव्हीचे एड्स संक्रमणाचे नियत्रंण व्हावे, यासाठी शासनाकडून लाखो रूपयांचा निधी खर्च केला जातो.
त्यामध्ये एचआव्हीबाबत जनजागृती करणे, एक खिडकी योजना, एचआयव्ही संक्रमित मुलांना पोषण आहार देणे, कायद्याविषयी जनजागृती, दर महिन्याला तपासणी आणि औषधोपाचार असे विविध प्रकारच्या माध्यमातून एचआयव्हीबाधित रूग्णांवर शासनाकडून निधी खर्च केला जातो. परंतु गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे लॉकडाऊन होते. त्यामुळे तपासणीसाठी एकत्रित जमल्यानंतर गर्दी होऊ शकते या उद्देशाने तपासणीची संख्याच कमी झाली आहे.
लॉकडाऊनपूर्वी जिल्ह्यात दरवर्षी 1 लाखाहून अधिक जणांची तपासणी केली जात होती. मात्र लॉकडाऊन नंतर ही तपसाणी 50 हजारांवर आली आहे. सन 2018-19 मध्ये 1 लाख 40 हजार रूग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 27 रूग्ण बाधित आढळले तर त्याचे प्रमाण 0.90 इतके होते. 2019-20 मध्ये 1 लाख 13 हजार रूग्णांची तपासणीमधून 983 रूगण आढळले आहे.
2020-21 मध्ये 1 लाख 3 हजार जणाच्या तपसाणीमधून 514 रूग्ण बाधित आढळले असून त्याचे प्रमाण 0.53 इतके आहे. चालू एप्रिल ते ऑक्टोंबर 2021 मध्ये आतापर्यंत 52 हजार तपासणीतून 353 रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरेाना काळात एक प्रकारे एचआयव्हीबाधितांचे हाल झाले.
जिल्ह्यात 148 महिला एचआयव्ही बाधित
सन 2018-19 मध्ये 1 लाख 34 हजार गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 52 महिला पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. 2019-20 मध्ये 1 लाख 31 हजार गरोदर मातांची तपासणी केली असून 42 रूग्ण बाधित आढळले आहेत. 2020-21 एक लाख 14 हजार जणांची तपासणी केली,37 बाधित आढळले.चालू वर्षी आतापर्यंत 58 हजार रूग्णांच्या तपासणीतून 15 बाधित आढळले असून आतापर्यंत जिल्ह्यात 148 महिला एचआयव्ही बाधित आढळल्या आहेत.
गुप्तरोग रुग्णांना बाधिताचा धोका अधिक
एचआयव्ही बाधितांसाठी नॅको एड्स अॅप
कोरोना काळात तपासणीत घट
हेल्पलाईनसाठी फ्री क्रमांक 1097
सध्या जिल्ह्यातील 12 हजार एचआयव्ही रुग्णांना शासनाकडून येणारे औषधे देत आहोत. यापूर्वी महागडे औषधे घेण्यासाठी एचआयव्ही बाधित रुग्णांना मुंबईला जावे लागत होते. त्यासाठी 8 हजार रूपये खर्च रूगणाना करावे लागत होते. पंरतु जे जे. हॉस्पिटलमधील औषधे आता सोलापूरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिळू लागले आहेत.
भगवान भुसारी,
जिल्हा कार्यक्रम अधिकारी