प्रसूती : परिचारिकेचा प्रसूती दरम्यान मृत्यू

प्रसूती : परिचारिकेचा प्रसूती दरम्यान मृत्यू
Published on
Updated on

हिंगोलीमध्ये शेकडो स्त्रियांची यशस्वी प्रसूती करणाऱ्या हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिकेला प्रसूती दरम्यान मृत्यूने कवटाळले असल्याची दुःखद घटना घडली आहे. ज्योती गवळी असे या मयत परिचारिकेचे नाव आहे.

मागील अनेक वर्षांपासून त्या हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूती कक्षात कर्तव्य बजावत होत्या. २ नोव्हेंबर रोजी, जिल्हा रुग्णालयात त्यांना नातेवाईकांनी प्रसूतीसाठी भरती केले. त्यांच्या वर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. या दरम्यान ज्योती यांनी सुदृढ बालकाला जन्म दिला आहे.

दुसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. शांत संयमी असलेल्या या परिचारिकेच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news