पुढारी ऑनलाईन डेस्क : टी२० वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान ग्रुप स्टेजमध्येच भिडणार आहे. आयसीसीने आज युएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी२० वर्ल्डकपच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले.
सुपर १२ मध्ये दुसऱ्या ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे. टी२० वर्ल्डकप ची पहिली फेरी झाल्यानंतर यामध्ये अजून दोन संघ समाविष्ट करण्यात येतील.
आयसीसीने जाहीर केलेल्या दोन ग्रुपमध्ये अजून चार संघ जोडले जाणार आहेत. आयसीसीने टी२० वर्ल्डकप स्पर्धेचे ग्रुप हे २० मार्च २०२१ पर्यंतच्या आयसीसी रँकिंगवरुन ठरवण्यात आले आहेत.
पहिल्या ग्रुपमध्ये गतविजेता वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे.
अधिक वाचा :
टी२० वर्ल्डकप ची पहिली फेरी आधी होणार आहे. यासाठी श्रीलंका, आयरलँड, नेदरलँड आणि नांबिबिया हे ग्रुप अ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
तर ग्रुप ब मध्ये बांगलादेश, स्कॉटलँड, पापुआ न्यू जिनिया आणि ओमान यांचा समावेश आहे.
ग्रुप अ मधील विजाता आणि ग्रुप ब मधील उपविजेता हा मुख्य ग्रुप १ मध्ये समाविष्ट केला जाईल.
ग्रुप ब मधील विजेता आणि ग्रुप अ मधील उपविजेता संघ ग्रुप २ मध्ये समाविष्ट केले जाणार आहेत.
अधिक वाचा :
आयसीसीचे सीईओ जॉफ ऑलर्डीस यांनी 'आम्हाला आयसीसी टी२० वर्ल्डकप साठीचे ग्रुप जाहीर करण्यास आनंद होत आहे. या ग्रुपमध्ये काही रोमांचक सामन्यांचा समावेश आहे. यामुळे स्पर्धेत जान येणार आहे.
'कोरोना महामारीत आम्ही ही पहिली अनेक संघ समाविष्ट असलेली स्पर्धा आयोजित करत आहोत.' असे वक्तव्य प्रसिद्ध केले.
दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शहा म्हणाले की, 'ग्रुप जाहीर झाल्यापासूनच टी२० वर्ल्डकप ची सुरुवात झाली आहे. या दोन्ही ग्रुपमध्ये तसा फारसा फरक नाही. कारण या दोन्ही ग्रुपमध्ये टी२० चे एकसे एक दमदार संघ समाविष्ट आहेत.'
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : यम भाईने पुणे पोलिसांच्या कशा खाल्या लाता
https://youtu.be/0r76elg4NLE