मिशेल स्टार्क Vs आंद्रे रसेल : स्ट्राईक न देण्याचा निर्णय अंगलट | पुढारी

मिशेल स्टार्क Vs आंद्रे रसेल : स्ट्राईक न देण्याचा निर्णय अंगलट

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल स्टार्क वेस्ट इंडिज विरुद्धच्या चौथ्या टी – २० सामन्यात चांगचाच चमकला. स्टार्कने टाकलेल्या शेवटच्या षटकामुळे ऑस्ट्रेलियाने विंडीजचा ४ धावांनी पराभव केला.

विशेष म्हणजे शेवटचे षटक खेळण्यासाठी विंडीजचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल खेळपट्टीवर होता.

मिशेल स्टार्क शेवटचे षटक टाकण्यासाठी आला त्यावेळी वेस्ट इंडिजला विजयासाठी ११ धावांची गरज होती. त्याच्या आधीच्या म्हणजेच १९ व्या षटकात रिले मेरेडीथने २५ धावा दिल्याने सामना विंडीजकडे झुकला होता.

त्यानंतर कर्णधार अॅरोन फिंचने अखेरचे षटक टाकण्यासाठी आपला सर्वात अनुभवी गोलंदाज स्टार्कला पाचारण केले.

अधिक वाचा : 

शेवटचे षटक टाकणारा मिशेल स्टार्क दबावात असलेल्या ऑस्ट्रेलियासाठी देवदूत बनून आला. त्याने षटकाचा पहिलाच चेंडू वेगवान यॉर्कर टाकत रसेलला हात खोलण्याची संधी दिली नाही.

रसेलने स्टाईक आपल्याकडेच ठेवण्यासाठी धाव घेतली नाही.

रसेलने स्ट्रईक ठेवली आपल्याजवळच

पण, ही त्याची मोठी चूक ठरली कारण मिशेल स्टार्क ज्याने षटकाची अप्रतिम सुरुवात केली होती. त्याने पुढचे चार चेंडू निर्धाव टाकत विंडीजला पर्यायाने रसेलला चांगलाच धक्का दिला.

त्याच्या या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने जवळपास सामना जिंकला. अखेरच्या चेंडूवर रसेलने षटकार ठोकला खरा पण, तोपर्यंत विंडीज सामना हरला होता.

मिशेल स्टार्कचे हे शेवटचे षटक सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

अधिक वाचा : 

विजय ऑस्ट्रलियाचा मालिका विंडीजची

या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने १८९ धावा उभारल्या होत्या. यात मिशेल मार्शच्या ७२ धावांचे मोठे योगदान होते. तर कर्णधार फिंचने ५३ धावा केल्या होत्या.

याच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजनेही चांगली फलंदाजी केली. लिंडन सिमन्सने ७२ धावांची खेळी करुन दमदार सुरुवात केली. मात्र त्यानंतर विंडीजचा डाव घसरला.

ऑस्ट्रेलियाने जरी चौथा सामना जिंकला असला तरी वेस्ट इंडिजने ५ सामन्यांची टी – २० मालिका ३ – १ अशी आधीच खिशात टाकली आहे. तीन पराभानंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाने विजयाचे खाते उघडले आहे.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : ब्राझीलचे सीताफळ पिकणार मुंबईच्या टेरेसवर

Back to top button