मनोरंजन

अवधूत गुप्ते-स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात ‘कोकणचा गणपती’

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : गणपती बाप्पाचं आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे. बाप्पाच्या आगमनाची तयारी प्रत्येक घरात सुरू आहे. कोकणातील लोकांसाठी हा गणपतीचा म्हणजेच चतुर्थीचा सण अगदी जिव्हाळ्याचा, आपुलकीचा आणि अभिमानाचा विषय असतो. आता अवधूत गुप्ते-स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात 'कोकणचा गणपती' गाणं ऐकायला मिळणार आहे. अवधूत गुप्ते-स्वप्नील बांदोडकर यांच्यासोबत लोकप्रिय गायिका वैशाली सामंतचाही आवाज आहे. चिंतामणी सोहोनी यांनी या गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे आणि गायलंदेखील आहे.

राज्यात नव्हे तर जेथे कुठेही बाप्पाचे भक्त आहेत तेथे सुरु झाली आहे. गणपती बाप्पा बुद्धीची, विद्येचं, बुद्धीचं आणि कलेचं दैवत आहे. संगीत क्षेत्रासाठी बाप्पा म्हणजे एक पर्वणी असते. बाप्पाची नानाविध रूपं आहेत.

नानाविध प्रकारे बाप्पाची पूजा केली जाते. मुंबईतले सगळे चाकरमानी गणपतीसाठी अगदी जय्यत तयारी करून कोकणची वाट धरतात.

सागरिका म्युझिकने संगीत क्षेत्रात आपले वैविध्य आणि वेगळंपण जमले आहे. या वर्षी सागरिका म्युझिक रसिकांसाठी कोकणचा गणपती घेऊन आले आहेत. हो "कोकणचा गणपती " हे गाणं ऑडिओ आणि व्हिडिओ येणार आहे. सागरिका आपल्यासाठी घेऊन आले आहेत हे खास गाणं.

तीन लोकप्रिय दिग्गज गायकांचा स्वरसाज 

चिंतामणी सोहोनी यांनी या गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. तसेचं गायलंही आहे. चिंतामणीसोबत या गाण्यात महाराष्ट्रातील हे तीन सुप्रसिद्ध गायक वैशाली, स्वप्नील आणि गुप्ते यांनी स्वरसाज दिला आहे.

रघुनाथ मतकरी यांनी या गाण्याचे शब्द लिहिले आहेत. सागरिका दास यांनी दिग्दर्शन केलेल्या या गाण्याचा व्हिडिओ सुद्धा कोकणातील गणपती उत्सवाची आठवण करून देतो.

कोकणातली घरगुती गणपतीची सजावट इत्यादी पाहून आपणही अगदी कोकणात असल्याचं वाटतं.

या गाण्याचा ऑडिओ ६ सप्टेंबरपासून सर्व streaming प्लॅटफॉर्म्स वर ऐकायला मिळेल.

चिंतामणी सोहोनी आणि या वरील ३ गायक यांच्यावर चित्रित केलेला व्हिडिओ ७ सप्टेंबरला सागरिका म्युझिकच्या मराठी YouTube channel वर पाहता येईल.

हेही वाचलं का ?

पाहा व्हिडिओ – 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT