राणादा-पाठकबाई यांचा अंदाजचं वेगळा, पहा त्यांचा राजेशाही थाट | पुढारी

राणादा-पाठकबाई यांचा अंदाजचं वेगळा, पहा त्यांचा राजेशाही थाट

पुढारी ऑनलाईन : तुझ्यात जीव रंगला मधील राणादा-पाठकबाई यांनी प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाचं वेड लावलं. राणादा म्हणजेच हार्दिक जोशी सध्या नव्या मालिकेत दिसतोय. या मालिकेचं नाव आहे-तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं… या मालिकेत त्याच्यासोबत अमृता पवार ही अभिनेत्री काम करतेय. आता राणादा-पाठकबाई ही जोडी पुन्हा एका नव्या लूकमध्ये आपल्याला पहायला मिळताहेत.

अधिक वाचा-

अनुष्का शर्मा म्हणते, सेलिब्रिटीच्या मृत्यूचा केला जातो ‘तमाशा’

ऋषी कपूर यांनी करून ठेवला होता शेवटचा चित्रपट, मृत्यूनंतर…

 

अक्षया देवधर हिने तुझ्यात जीव रंगला या मालिकेत पाठकबाईसोबत काम केलं होतं. ही जोडी पुन्हा सोशल मीडियावर अवतरली आहे. तेही रॉयल अंदाजात.

अधिक वाचा-

जावेद अख्‍तर म्‍हणाले, संघ आणि बजरंग दलाचे समर्थक तालिबान्‍यांसारखेच

नीतू कपूर : ‘कपूर कुटुंबीय वरून रूबाबदार आणि आतून पोकळ बांबू’

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत रांगड्या तरुणाची भूमिका साकारणारा हार्दिक शाही लूकमध्ये पाहायला मिळतोय. निमित्त आहे -फोटोशूटचं. हार्दिक आणि अक्षया देवधर यांच्या इन्स्टावर पाहिलं तर दोघांचे नवे फोटोशूट पाहायला मिळतेय.

अधिक वाचा-

तु घातलेली BRA मोठी झाली, की तुला कपडे कमी पडले आहेत?

Sidharth Shukla : सिद्धार्थच्या जाण्याने शहनाज पूर्णपणे कोलमडली; फोटो व्हायरल

त्याचबरोबर काही व्हिडिओदेखील पाहायला मिळतेय. शाही लूकमधील व्हिडिओ आणि फोटोमध्ये दोघे दिसतात. अक्षया वधूच्या पोशाखात साजशृंगार केलेली दिसते. तर हार्दिक शेरवानी आणि शाही फेट्यात दिसतो. ही जोडी नटूनथटून फोटोशूट करतानाही दिसतेय.

गळ्यात मोत्यांच्या माळा आहेत. अक्षयाने गडद मरून रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. त्याला साजेसे दागिने घातले आहेत. हार्दिकने काळ्या रंगाचा डिझायनर सूट परिधान केला आहे. डोक्याला भरजरी फेटा बांधला आहे.

हार्दिक आणि अक्षया यांनी व्हिडिओतून प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्यांनी पुन्हा एकदा नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

नव्या मालिकेत काम करण्याचं दडपण : हार्दिक जोशी

हार्दिक सध्या तुझ्या माझ्या संसाराला या मालिकेत सिध्दार्थ नावाच्या तरुणाची भूमिका साकारत आहे. तो या भूमिकेविषयी तो म्हणतो, तुझ्या जीव रंगला मालिकेत ततो इमोशनल होता.

या मालिकेतील सिध्दार्थ प्रॅक्टिकल आहे. त्यामुळे ही भूमिका साकारताना दडपण येतं.

सिद्दार्थ एकत्र कुटुंबात वाढलेला आहे. त्याच्या घरचं वातावरण पारंपरिक आहे. त्याला स्वत:च्या पायावर उभं राहायचं आहे. त्याला जेव्हा ही ऑफर मिळाली तेव्हा त्याने लगेचंच होकार दिला होता. कारण आधीच्या भूमिकेपेक्षा सिध्दार्थची भूमिका वेगळी आहे.

पण, अजुनही लोक मला राणा नावाने ओळखतात आणि हाक मारतात. आता सिध्दार्थ म्हणून माझी ओळख निर्माण व्हावी, असं मी प्रयत्न करतोय. प्रेक्षक सिध्दार्थवरदेखील खूप प्रेम करतील, असं मला वाटतयं.

अक्षया सध्या कोणत्याही मालिकेत दिसत नाही. काही दिवसांपूर्वी अक्षयाने नवे फोटोशूट केले होते. तिने हे फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

हेदेखील वाचा-

कोकण महामार्गासाठी मुंबई बंद पाडू! कोकण महामार्ग समितीचा इशारा

धुळे : ट्रकला अपघात; मासे लुटण्यासाठी नागरिकांची उडाली झुंबड

मनोहर भोसले विरोधात उचलला बाळूमामांचा भंडारा; आदमापूरकर एकवटले 

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

Back to top button