Sonalee Kulkarni : गुलाबी रंगात निळी साडी, मोकळी पाठ अन्… | पुढारी

Sonalee Kulkarni : गुलाबी रंगात निळी साडी, मोकळी पाठ अन्...

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) सध्या तिच्या नवनव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. सध्या सोनालीने आणखी एक निळ्या साडीतील क्लासी लूक शेअर केला आहे.

सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊटवर नुकतेच साडीतील हटके आणि क्लासी काही फोटो शेअर करत चाहत्यांना भूरळ घातली आहे. साडीतील हा लूक तिच्या सौंदर्यात आणखीन भर घालत आहे.

निळ्या साडीत सोनाली कुलकर्णी

या फोटोत सोनाली गुलाबी रंगात निळ्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या देखण्या रुपात सोनालीचे सौंदर्य आणखीन खुलले आहे. यासोबत सोनालीने शिवलेस ब्लाऊजसोबत कमरेवर पट्टा घातला आहे.

एकीकडे सोनालीने आपल्या कमरेवर हात ठेवून पोझ दिली आहे. तर दुसरीकडे तिच्या निळ्या रंगाच्या साडीचा पदर हवेत तरंगताना दिसत आहे. याशिवाय तिने यावर मॅचिंग कानातले घातले आहेत.

या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने ‘कारण आहे गुलाबीचे’ (Because “Pink” was the theme!) अशी हटके कॅप्शन लिहिली आहे.

सोनाली हे फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर कॉमेंन्टसचा पाऊस पडत आहे. तर एका युजर्सने ‘तुम्हाला जेव्हा पाहावे तेव्हा आधीपैक्षा सुंदर दिसता’. तर दुसऱ्याने एकाने ‘तुमच्या कानातली मला एका कलेसाठी प्रेरणा देते’. तिसऱ्याने ‘हा लूक सर्वोत्तम आहे’. चौथ्याने ‘अप्रतिम’. अशा वेगवेगळ्या कॉमेंन्टस केल्या आहेत.

या फोटोंवर कॉमेंन्टस करत आगीचा आणि हास्याचा ईमोजी शेअर केला आहे.

सोनाली गेल्या काही दिवसांपासून आपल्या पती कुणाल बेनोडेकरसोबत मालदिवमध्ये सुट्याचा आनंद एन्जॉय करत आहे.

तेथूनच ती आपल्या चाहत्यांसाठी हटके फोटोशूट करत असते. लग्नानंतर सोनालीच्या सौंदर्य दिवसेंदिवस खुलत आहे.

याआधी सोनालीने जांभळ्या रंगाचा टॉप आणि निळ्या जिन्समध्ये पर्पल फोटोशूट केले होते. या पर्पल फोटोशूटपूर्वी सोनालीने वेस्टर्नमध्ये नथीचा नखरा दाखवला होता. #नथीचानखरा returns!अशी कॅप्शन देत सोनालीने खास फोटोशूट केले होते.

हेही वाचलंत का?

Back to top button