मनोरंजन

BB Marathi 3 : जाणून घेऊया दादा कोंडकेंच्या नातवाविषयी…

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : BB Marathi 3 : व्यवसायाने मॉडेल आणि अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीचा जावई अक्षय वाघमारे याने शोमध्ये एन्ट्री घेतलीय. काही कलाकार आणि अनेय सेलेब्सचाही समावेश या शोमध्ये समावेश आहे. तुम्हाला अक्षय वाघमारे विषयी माहितीये का?

अक्षयचा जन्म १९८८ मध्ये मुंबईत झाला. तेथेच त्याने मॉडेल कॉलेजमधून शिक्षण घेतले. त्याने कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी मिळवलीय. पुढे तो पुण्याला गेला. याच विषयातून त्याने पुण्यातून पदव्युत्तर शिक्षण घेतले.

BB Marathi 3 : अक्षय मॉडेल जरी असला तरी तो अभिनयदेखील करतो. तो फिटनेस फ्रिकदेखील आहे. तो सोशल मीडियावर नेहमी ॲक्टिव्ह असतो. आपल्या फिटनेसेचे व्हिडिओदोखील तो शेअर करत असतो. मॉडेलिंग करत असतानाचं त्याला अभिनय करण्यासाठी संधी मिळाली.

अक्षयने फत्तेशिकस्त, बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप यांसारख्या चित्रपटात काम केलंय. त्याने मालिकेतही काम केलंय. 'ती फुलराणी' मालिकेत त्याने अभिनय साकारलाय. २०१९ मध्ये अक्षय वाघमारेला 'हॉटेस्ट मॅन ऑफ द मराठी टीव्ही' हा किताब मिळाला आहे.

अरुण गवळी आणि अक्षय वाघमारे

योगिता झाली सहचारिणी

अक्षयने अरुण गवळीची मुलगी योगिताशी २०२० मध्ये लग्न केलंय. योगिता आणि अक्षयची आधीपासून मैत्री होती. ते तासनतास एकमेकांशी फोनवरून बोलायचे.

त्यामुळे अक्षयच्या घरचे म्हणाले की, तुम्ही लग्नाचा विचार का करत नाही? यावर अक्षय आणि योगिता यांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्यांचं लग्न अरुण गवळीचा दबदबा असलेल्या दगडी चाळीमध्ये झाले होते. दोघांना ७ मे २०२१ रोजी एक मुलगी झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT