Dombivli rape case प्रकरणातील ‘तो’ मोबाईल पोलिसांच्या हाती | पुढारी

Dombivli rape case प्रकरणातील 'तो' मोबाईल पोलिसांच्या हाती

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : Dombivli rape case : डोंबिवली जवळच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीवर तब्बल ३३ नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. अत्याचार करणाऱ्या ३३ पैकी २९ जणांना आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यात दोन अल्पवयीन युवकांचा सहभाग आहे.

अत्याचारकांडातील अन्य ४ जण अद्याप हाती लागले नसून पोलिस त्यांचाही कसोशीने शोध घेत आहेत. दरम्यान, पीडित मुलीच्या तथाकथित मित्राने ज्या मोबाईलमधून आक्षेपार्ह क्लिप बनवून तिला ब्लॅकमेल केले होते. तो मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.

Dombivli rape case प्रकरणातील सदर मोबाईल पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर इतर आरोपींचे देखील मोबाईल जप्त करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे.

या घटनेतील संपुर्ण पुरावे गोळा करण्यासाठी आणि पुढील तपासासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके स्थापन करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पीडित मुलीवर ज्या- ज्या ठिकाणी अत्याचार करण्यात आले त्या घटनास्थळी पोलीस आरोपींना नेऊन घटनेचा पंचनामा करण्यात येत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button