मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठी या शोतील घरात रोज नवं काहीतरी पाहायला मिळत आहे. राडा, भांडण, आणि वादग्रस्त शो असला तरी प्रेक्षक मात्र हा शो आवर्जुन पाहतात. या शोचे तिसरे सीझन सुरू झाले आहे. 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झालीय. या शोने प्रेक्षकाचं लक्ष वेधून घेतलं आहे. यावेळी स्पर्धक म्हणून कीर्तनकार शिवलीला पाटील यांची एन्ट्री झालीय. यानंतर मात्र, नेटकऱ्यांकडून शिवलीला पाटील यांना ट्रोल केलं जात आहे.
'बिग बॉस मराठी ३'च्या घरात प्रत्येक स्पर्धकाला घरात टिकून राहण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. यातीलचं एक भाग आहे-टास्क. दिलेला टास्क पूर्ण करण्यासाठी प्रत्येक स्पर्धक जोर लावून प्रयत्न करत असतो.
शिवलीला यांनादेखील टास्क करावा लागला. नेहमीच स्टेजवर उभे राहून त्या कीर्तन करायच्या. पण, या शोमधील टास्क करताना प्रेक्षकांनी पाहिलं. त्यानंतर त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
सोशल मीडियावर त्यांना नेटकऱ्यांनी सुनावले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टवर नेटकरी म्हणतात- वारकरी संप्रदायाच्या लोकांसाठी ही जागा नाही.. हे स्पष्टपणे दर्शवते की आपण प्रसिद्धी निवडता. एक नेटकरी म्हणतो-चुकीचा निर्णय घेतला. ताई…बिग बॉस हा फालतू अड्डा आहे.
दुसरा नेटकरी म्हणाला, 'लोका सांगे ब्रह्म ज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण.'
आणखी एक नेटकरी म्हणाला, 'ज्ञानेश्वरीला परवानगी दिली नाही. तेव्हाच नकार द्यायला हवा होता.
तिसरा नेटकरी म्हणाला-'ताई चुकीचं आहे हे तुम्ही लोकांना ज्ञान शिकवता आणि तुम्ही जात आहात म्हणजे अवघड आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला-वयस्कर महिलांना मालिका बघता म्हणून नाव ठेवत होता.
झाले चालू नखरे, एकडे इज्जत काडायची बाकी आहे, एवढी इज्जत कमावली तेवढी घालवून जाणार अशा शब्दांत प्रकारची टीका त्यांच्यावर होत आहे.