मल्लिका शेरावत हिचा 'कास्टिंग काउच'वर मोठा खुलासा, रात्रीच्या पार्ट्या अन्... | पुढारी

मल्लिका शेरावत हिचा 'कास्टिंग काउच'वर मोठा खुलासा, रात्रीच्या पार्ट्या अन्...

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या लाईमलाईटपासून दूर आहे. पण, ती या ना त्या कारणाने चर्चेत येते. सध्या ती आपल्या पर्सनल लाईफवरून चर्चेत आलीये. तिने कास्टिंग काउच विषयी खुलासा केला आहे. तिला आलेले कटू अनुभव तिने शेअर केले आहेत. तिची ‘बोल्ड’ ऑनस्क्रीन इमेज पाहून अनेक मेल ॲक्टर तिच्या जवळ यायचा प्रयत्न करायचे. पण, तिने नेहमी आपले मत स्पष्टपणे सांगितले. समझोता करण्यास तिने नेहमीचं नकार दिल्याचे मल्लिका शेरावत सांगते.

राज्यसभा पोटनिवडणूक : फडणवीसांच्या भेटीवरून ‘मविआ’त धूसफूस

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणात राजकीय नेत्यांचे नातेवाईक

बोल्ड सीन दिल्याने माझी…

एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं होतं. ती म्हणाली-मी या कास्टिंग काउचचा थेट सामना करू शकले नाही. माझं स्टारडम वाढत गेलं. मी भाग्यवान होते. माझ्यासाठी हे खूप सोपं होतं.

मुलांचे लसीकरण करताना…

महानगरपालिका निवडणुका : ‘मिनी विधानसभा’!

मी मुंबईला आले तेव्हा मला ख्वाहिश आणि मर्डर यासारखे चित्रपट मिळाले. त्यामुळे मला खूप संघर्ष करावा लागला नाही.

मर्डर खूप अधिक बोल्ड चित्रपट होता. परंतु. या चित्रपटानंतर माझी बोल्ड इमेज झाली. त्यामुळे अनेक अभिनेते म्हणाले की, तू जर पडद्यावर बोल्ड होऊ शकतेस तर वैयक्तिकरित्या बोल्ड होऊ शकते.

RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्ससमोर ‘सुपर’ आव्हान

कसुरी मेथी मुळे रक्‍तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मिळते मदत

मी समझोता नाही केला…

मल्लिका म्हणाली, ते लोक माझ्या ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन व्यक्तित्वमधील अंतर नाही समजू शकले. त्यामुळे मला अनेक संकटांचा सामना करावा लागला. कारण, मी एक खूप स्ट्रॉन्ग महिला आहे. मी थेट सांगून टाकलं की, मी समझोता नाही करणार.

कारण, मी बॉलिवूडमध्ये समझोता करायला आलेले नाही. येथे करिअर करण्यासाठी आलेय. त्यानंतर त्या अभिनेत्यांनी माझ्योसोबत कधी काम केलं नाही.

रात्रीच्या पार्ट्या किंवा ऑफिसमध्ये कुणाला नाही भेटले.

मी बॉलिवूड पार्ट्यांमध्ये कधी गेले नाही. मी कोणी निर्माता वा दिग्दर्शकाला रात्री हॉटेलमध्ये किंवा खोलीत भेटायला गेले नाही. मी स्वत:ला दूर ठेवलं. मी विचार केला की, जे माझे भाग्य आहे, ते मला मिळेल. मला हे सर्व करण्याची गरज नाही.

कोल्हापूर महापालिका निवडणूक : प्रभागांचा चेहरा-मोहरा बदलणार 

हाता-पायात का येतात मुंग्या?

कोल्हापूर : पर्यटक-भाविकांचा ओघ वाढला

 

View this post on Instagram

 

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat)

Back to top button