मुंबई; पुढारी ऑनलाईन : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे नागरी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात वाद सुरू आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. निधी वाटपात भुजबळ अधिकाराचा गैरवापर करत असल्याचा कांदे यांचा आरोप आहे. भुजबळ, कांदे दोघेही निवडून आलेले आमदार आहेत. त्यांनी एकमेकांचा सन्मान राखला पाहिजे, असे राऊत म्हणाले.
कांदे यांनी नियोजन समितीचा निधी विकल्याचा भुजबळ यांच्यावर आरोप केला आहे. याबाबत त्यांनी भुजबळ यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
दाखल याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांना देखील प्रतिवादी करण्यात आले आहे. आमदार कांदे यांनी भुजबळांनी निधी विकल्याचा पुरावा असल्याचा दावा केलाय.
काही दिवसांपूर्वी भुजबळ आणि कांदे यांच्यात बैठकीदरम्यानही वाद निर्माण झाला होता.
दरम्यान, राऊत यांनी थिएटर्स सुरू करण्याबाबत विचार सुरु असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असल्याचेही ते म्हणाले.
पाहा व्हिडिओ –