sonakshi sinha  
Latest

Sonakshi Sinha engagement : सोनाक्षी सिन्हानं दिली गुड न्यूज, मात्र पार्टनरचा चेहरा लपवला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलीवूड गॉर्जियस दिवा सोनाक्षीने साखरपुडा केल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. (sonakshi sinha engagement) अभिनेत्री सोनाक्षीने सोशल मीडिया पोस्टद्वारे तिचे काही फोटो शेअर केल्याने चर्चेला उधाण आले. (sonakshi sinha engagement) तिने एका फोटोत आपली अंगठी दाखवलीय. त्यामुळे सोशल मीडिया युजर्सनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.. सोनाक्षीने फार लाईमलाईटमध्ये न राहता अचानक चाहत्यांनी सुखद धक्का दिलाय.

सोनाक्षीने एंगेजमेंट रिंग दाखवली

एका फोटोमध्ये दबंग गर्ल सोनाक्षी तिची एंगेजमेंट रिंग दाखवताना दिसत आहे. सोनाक्षीचा मित्र, फियान्से तिचा हात धरताना दिसत आहे. मात्र, सोनाक्षीचा लाडका जोडीदार कोण आहे, यावर अद्यापचा सस्पेन्स कायम होता, आणि आताही तो आहे. कारण, फोटोंमध्ये फक्त त्याचा हात दिसतो आहे. चेहरा मात्र लपलेला दिसत आहे. सोनाक्षीने आपल्या पार्टनरसोबत रोमँटिक पोज दिल्या आहेत.

सोनाक्षी तिच्या पार्टनरच्या खांद्यावर डोकं टेकलं आहे. दुसऱ्या फोटोत सोनाक्षी तिच्‍या पार्टनरचा हात धरून हसत आहे. या फोटोंसोबत तिने कॅप्शन लिहिलीय की- BIG day for me!!! One of my biggest dreams is coming truuuue… and i cant wait to share it with YOUUUU ?? Cant believe it was SO EZI!!!! ❤️❤️❤️

तिचा सर्वात मोठा दिवस आहे. तिची स्वप्ने सत्यात उतरत आहेत. मी हे शेअर करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही, असे तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. एकापाठोपाठ एक असे तीन फोटोज तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत. त्याच कॅप्शनमध्ये सोनाक्षीने तिचा उत्साह आणि आनंद व्यक्त केला आहे.

कोण आहे सोनाक्षीचा हमसफर?

सोनाक्षी साखरपुड्याच्या चाहत्‍यांना आनंद झाला आहे. पण अभिनेत्रीची पोस्ट पाहिल्यानंतर त्यांना उत्सुकता लागून राहिली आहे की, तो लकी बॉय कोण आहे, ज्याला अभिनेत्रीने आपला साथीदार बनवण्‍याचा निर्णय घेण्‍याचा आहे. जोडीदाराचे नाव जाहीर केले नसले तरी हा लकी बॉय दुसरा कोणी नसून 'नोटबुक' फेम अभिनेता झहीर इक्बाल आहे, असे म्हटले जात आहे.

सोनाक्षी आणि जहिरच्या डेटिंगची चर्चा होत होती. पण, दोघांनीही डेटिंगचा वृत्ताला दुजोरा दिला नव्हता. आता सोनाक्षीचा पार्टनर झहीर इक्बाल आहे की आणखी कोण, हे लवकरच कळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT