वाशीम : देव दर्शन करून परतताना काळाचा घाला; उभ्‍या ट्रेलरला कारची धडक, २ ठार, ५ गंभीर जखमी | पुढारी

वाशीम : देव दर्शन करून परतताना काळाचा घाला; उभ्‍या ट्रेलरला कारची धडक, २ ठार, ५ गंभीर जखमी

वाशीम; पुढारी वृत्तसेवा : वाशीम जिल्ह्यातील कारंजा शहरात रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रेलरला एर्टिगा कार धडकून झालेल्या अपघातात दोन जण ठार आणि पाच जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

याविषयी अधिक माहिती अशी की, कारंजा शहराजवळील समृद्धी महामार्गालगत ट्रेलर उभा होता. यावेळी देव दर्शनासाठी गेलेले इंगळे कुटुंब नागपूरकडे परतत असताना त्‍यांच्या एर्टिगा कारची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या या ट्रेलरवरला मागून जोरात धडक बसली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना बाहेर काढून अमरावतीला उपचारासाठी पाठवण्यात आले. उपचारादरम्यान २ जणांचा मृत्यू झाला असून, कारमधील इतर ५ जखमींवर उपचार सुरू आहेत.

Back to top button