Latest

shilpa shetty-raj kundra: मी राज कुंद्रा आहे का? मी त्‍याच्‍यासारखी दिसते का : शिल्‍पा शेट्‍टी

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पती राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी प्रकरणी बेड्या ठोकण्‍यात आल्‍या आणि अभिनेत्री शिल्‍पा शेट्‍टी अडचणीत आली. ( shilpa shetty-raj kundra: ) पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला मागील आठवड्यात न्‍यायालयाने जामीनही मंजूर केला. यानंतरही शिल्‍पा शेट्‍टीने मौन बाळगणे पसंद केले होते. मात्र एका कार्यक्रमावेळी माध्‍यम प्रतिनिधीने तिला राज कुंद्राबाबत सवाल केल्‍यावर ती चांगलीच भडकली. ( shilpa shetty-raj kundra: ) तिने उलट सवाल करत पुन्‍हा एकदा मूळ प्रश्‍नाला बगल दिली.

अभिनेत्री शिल्‍पा शेट्‍टीचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक केली होती.

दोन महिन्‍यानंतर मागील आठवड्यात त्‍याला जामीन मंजूर झाला आहे.

मी राज कुंद्रासारखी दिसते का?

एका कार्यक्रमावेळी माध्‍यम प्रतिनिधीने शिल्‍पाला राज कुंद्रा याच्‍या संदर्भात प्रश्‍न केला.

यावेळी शिल्‍पा शेट्‍टी म्‍हणाले, मी राज कुंद्रा आहे का. मी त्‍याच्‍यासारखी दिसते का, मी कोण आहे, अशी प्रश्‍नांची सरबत्तीच तिने केली.

मी एक सिलिब्रिटी आहे त्‍यामुळे कधीच तक्रार करु नये आणि कोणत्‍याही गोष्‍टीबाबत खुलासा करु नये, असे माझे जीवन जगण्‍याचे तत्‍वज्ञान आहे, असेही तिने सुनावले.

( shilpa shetty-raj kundra: ) राज कुंद्रा याला पोर्न व्‍हिडिओ ॲप प्रकरणी अटक करण्‍यात आली होती.

यावेळी शिल्‍पा शेट्‍टीने एक पोस्‍ट केली होती. त्‍यामध्‍ये तिने म्‍हटलं होतं, तुम्‍ही नेहमी ऐकता की,कठीण प्रसंग तुम्‍हाला अधिक कणखर करतो. हे निश्‍चित खरं असावे;पण आपण समजतो इतके हे सोपे नाही.

राज कुंद्रा याला जामीन मिळाल्‍यानंतर तिने म्‍हटलं होते की, एखादा प्रसंगामुळे तुम्‍ही पूर्णपणे कोसळता; पण माझा विश्‍वास आहे की, सात वेळा तुम्‍ही कोसळला तरी तुम्‍ही आठव्‍यावेळी उभारले पाहिजे. इतकी ताकद तुमच्‍यामध्‍ये आवश्‍यक आहे.

कठीण काळात खूप धैर्य आणि प्रचंड आत्‍मबळाची गरज असते, असेही तिने म्‍हटले होते.

हेही वाचलं का? 

व्‍हिडिओ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT