शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा

Shilpa Shetty : राज कुंद्रासह शिल्पा शेट्टी अडचणीत, गुन्हा दाखल होणार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मोठ्या प्रमाणावर अश्लिल चित्रपटांची निर्मिती केल्याचा गंभीर आरोप असलेला व्यावसायिक राज कुंद्रा याच्यासह त्याची अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी आपली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप दिल्लीतील एका व्यापार्‍याने केला असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची विनंती रोहिणी न्यायालयात केली आहे.

गेमिंग, अ‍ॅनिमेशन, लायझनिंग, प्रौद्योगिकी, सौंदर्य उत्पादन निर्मितीत आपली कंपनी कार्यरत आहे. यात पैसा गुंतविला तर चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून राज कुंद्रा याने 41 लाख रुपये उकळले. असा आरोप विशाल गोयल नावाच्या व्यापार्‍याने केला आहे.

आपल्याकडून घेतलेले पैसे गैरउद्योगात लावल्याचेही गोयल यांचे म्हणणे आहे. रोहिणी न्यायालयाने यावर पोलिसांकडे कार्य अहवाल मागविला आहे.

आरोपांत तथ्य आढळले तर राज कुंद्रा तसेच शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांच्याविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो. रोहिणी न्यायालयात सदर प्रकरणाची पुढील सुनावणी 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

फसवणुकीच्या प्रकरणात उमेश गोयंका, सत्येंद्र सरुप्रिया, नंदन मिश्रा, एन. के. वाधवा आणि दर्शित शहा हे इसम होते, असा आरोपही गोयल यांनी न्यायालयासमोर केला आहे.

हे ही वाचा :

#26/11 : फ्रंटलाईन वर्करच्या भूमिकेत असणाऱ्या डॉ. सुजाता म्हणजेच मृण्मयी देशपांडेचा अनुभव

logo
Pudhari News
pudhari.news