राज कुंद्रा 'पोर्नोग्राफी' प्रकरणी अनेक धक्‍कादायक माहिती उजेडात | पुढारी

राज कुंद्रा 'पोर्नोग्राफी' प्रकरणी अनेक धक्‍कादायक माहिती उजेडात

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राज कुंद्रा ‘पोर्नोग्राफी’ प्रकरणाची मुंबई पोलिस क्राईम ब्रँच सखोल चौकशी करत आहेत. यातून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. १६ पानी ईमेल ट्रेलमधून अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत, असा दावा एका वृत्तवाहिनीने केला आहे. या ईमेलमुळे राज कुंद्रा ‘पोर्नोग्राफी’ प्रकरणातील अनेक धक्‍कादायक बाबी समाेर आल्‍या आहेत.

अधिक वाचा – 

राज कुंद्रा याच्या लंडन येथील केरनिन कंपनीशी हा मेल थेट संबंधित आहे. या कंपनीजवळ हॉटशॉट्स ॲप हाेते. राजला पोर्नोग्राफीच्या वितरणासंदर्भात अनेक गोष्टींची माहिती होती, असे रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले आहे.

या ॲपचा वापर सायबरवर्ल्डमध्ये पोर्न प्रसारित करण्यासाठी केला जायचा. या १६ पानांच्या मेल ट्रेलमध्ये काही धक्कादायक तपशील आहेत. अश्लील कंटेट पाहता पोर्न कंटेट वाढवण्यासाठी ईमेलचा वापर करण्यात आला.

अधिक वाचा – 

ईमेलच्या कॉपीमध्ये राज कुंद्राला रेखांकित करण्यात आले होते. कंटेंट जनरेशनमध्ये वापरल्या जाणाऱ्या मॉडेल्सचे संपर्क होते. तपशील किंवा कंटेंट प्रॉडक्शनसाठी कथितरीत्या असणाऱ्या ठिकाणांची माहिती, प्रत्येक गोष्टींचा उल्‍लेख मेलमध्ये तपशीलवार आहे.

त्या ईमेलच्या माध्यमातून सर्व गोष्टींचा संदर्भ होता.

अधिक वाचा – 

२८ जुलैला मुंबई कोर्टाने अश्लील चित्रपट आणि त्याचे प्रसारण केल्या प्रकरणी त्याची जामीन याचिका फेटाळली आहे.

अश्लील फिल्म बनविणे आणि त्यांचे काही अ‍ॅपद्वारे वितरण करणे या प्रकरणी कुंद्राला मुंबई क्राईम ब्रँचने अटक केली होती.
त्याला २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली होती.

raj kundra
राज कुंद्रा

राजच्या न्यायालयात कोठडीत वाढ

यानंतर पुन्हा कोर्टाने त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविले.

त्याचदिवशी न्यायालयाने त्याला तात्पुरता दिलासाही देण्यास नकार दिला.

राजला १९ जुलै रोजी २ तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी अटक केली होती. कुंद्रावर अश्लील चित्रपट बनवून ॲप्सवर प्रदर्शित करण्याचा आरोप केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. राज व्यतिरिक्त आणखीही काही जणांची पोलिस चौकशी करत आहेत. या दरम्यान राज यांना न्यायालयात हजर केले असता २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली होती.

एक वृत्तसंस्थेने मुंबई क्राईम ब्रँचच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले. ‘शिल्पा शेट्टी हिला अद्यापपर्यंत क्लीन चिट देण्यात आलेली नाही.

वेगवेगळ्या दृष्टीकोणातून आणि सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. फॉरेन्सिक ऑडिटर्सना नेमण्यात आले आहे. ते या प्रकरणातील सर्व अकाऊंट तपासत आहेत.

अधिक वाचा – 

पाहा व्हिडिओ – साडेचार वर्षाच्या आयुषने मुख्यमंत्र्यांना दिल्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

Back to top button