Latest

रशियन फौजा युक्रेनच्या राजधानीत पोहोचल्या ! आतापर्यंत काय घडले १२ मुद्यांमध्ये समजून घ्या

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाने युक्रेनवरील सलग दुसऱ्या दिवशी लष्करी कारवाई सुरुच ठेवली आहे. दरम्यान, तोडगा काढण्यासाठी द्विपक्षीय चर्चेसाठी रशियाने म्हटले आहे, मात्र त्यासाठी युक्रेन सैन्याला शस्त्रे खाली ठेवण्याची अट ठेवली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष होलोदीमीर झेलेन्स्की यांनी चर्चेसाठी तयार असल्याचे सांगत रशियाला शस्त्रसंधीचे आवाहन केले आहे.

अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी युक्रेनची राजधानी कीव काही दिवसांमध्येच रशिया काबीज करेल अशी भीती व्यक्त केली आहे. गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन ते चार दिवसांमध्ये रशिया पूर्ण ताबा मिळवण्याची शक्यता आहे.

रशियाकडून चर्चेची तयारी

युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाने चर्चेसाठी सहमती दर्शवली आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी रशिया चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे की, युक्रेनचे सैन्याने शस्त्रे खाली ठेवल्यास युद्धाला पूर्णविराम देवून रशिया चर्चेसाठी तयार आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध शिगेला पोहोचले आहे. रशियाने युक्रेनचे मोठे नुकसान केले आहे. जिवितहानी तसेच वित्तहानी वाढत चालल्याने युक्रेन सुद्धा चर्चेची तयारी दाखवली आहे.

लष्करी कारवाई; दुसऱ्या दिवशी काय घडले ?

  • रशियन फौजा युक्रेनच्या राजधानीजवळ येऊन पोहोचल्या
  • युक्रेनमध्ये रशियन लष्करी वाहनांचा ताफा किवच्या दिशेने
  • रशियामध्ये जवळपास ४५० जणांचा मृत्यू
  • किवमध्ये अनेक ठिकाणी स्फोटकांचा
  • युक्रेनमध्ये ३३ ठिकाणांवर रशियाकडून टार्गेट
  • युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांकडून रशियाला शस्त्रसंधीचे आवाहन
  • युक्रेनमध्ये आतापर्यंत १३७ जणांचा मृत्यू
  • चॅम्पियन्स लीग रशियातून पॅरिसमध्ये
  • युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्याशी चर्चा
  • झेलेन्स्की यांच्याकडून आणखी पाश्चिमात्य फौजांची मदतीची मागणी
  • रशियन विमानांना ब्रिटनशी निगडीत एअरस्पेसमध्ये मनाई

हे ही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT