राष्ट्रीय

तुमचं Facebook प्रोफाईल चोरुन कोण पाहतयं? आयडी पटकन लॉक करण्यासाठीची ट्रीक

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : Facebook सोशल मीडिया जगतातील एक सर्वात जास्त लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. Facebook आपले प्रोफाईल लॉक करण्यासह अनेक प्रायव्हसी फिचर्स देत आहे. जर एखादी व्यक्ती आपली प्रोफाईल लॉक करते तेव्हा फक्त त्यांच्या मित्रांनाच प्रोफाईल दिसेल.

याशिवाय अन्य वापरकर्त्यांना काही दिसणार नाही. लॉक प्रोफाईल च्या टाईमलाईनवर फोटो आणि पोस्ट, प्रोफाईल फोटो आणि कव्हर फोटो, स्टोरी आणि नव्या पोस्ट प्रोफाईल मधील मित्रांनाच दिसेल.

याशिवाय लॉक प्रोफाईलची पब्लिक पोस्ट पब्लिक राहणार नाही. फक्त आपल्याच मित्रांनाच दिसेल. Facebook प्रोफाईल लॉक केल्यानंतर तुमचा आयडी कोणालाही दिसणार नाही.

यामुळे तुमची माहिती सुरक्षित राहणार आहे. तर चला पाहूया आपण आपली प्रोफाईल लॉक कशी करायची.

मोबाईल अॅप वरुन कसे करायचे Facebook प्रोफाईल लॉक

  • सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्या फोनमधील फेसबुक अॅप ओपन करावे लागणार आहे. आणि यानंतर आपल्या प्रोफाईलवर क्लिक करायचे आहे.
  • यात अॅड टु स्टोरी नंतर तीन डॉट मेनू आयकॉन वरती क्लिक करायचे आहे.
  • या ऑप्शनमध्ये आपल्याला लॉक प्रोफाईल ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करा.
  • आता पुढच पेज तुम्हाला हे काम कस करत याविषयी माहिती देत. यात पुढे प्रोफाईल लॉक करण्यासाठी ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करा.
  • यात पुढ तुम्हाला यू आर लॉक प्रोफाईल अस दिसेल. ओके वर क्लिक करा.
file photo

Facebook प्रोफाइल अशी करा अनलॉक

जर तुम्ही फेसबुक प्रोपाईन अनलॉक करणार आहे.तर मोबाईलवरुन आणि डेस्कटॉप वरुन एकच ट्रीक आहे. लॉक प्रोफाईल ऑप्शनच्या ठिकाणी अनलॉक ऑप्शन दिसेल.

यावर क्लिक केल्यानंतर पुढं तुम्हाला अनलॉकची संपूर्ण माहिती मिळेल. सगळ्यात शेवटला अनलॉकचे ऑप्शन मिळेल. यावर क्लिक करुन तुमची प्रोफाईल अनलॉक होईल.

हे ही वाचलत का :

हे पाहा :

येत्या काळात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध – शीतलकुमार रवंदळे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT