मुंबई; पुढारी ऑनलाईन : BigBoss OTT सध्या चर्चेत आहे. BigBoss OTT या शोतील प्रत्येक स्पर्धकासोबत काही ना काही घडत आहे. प्रतीकने मर्यादा ओलांडली होती. म्हणूनच मी त्याच्याशी 'असं' वागले, असा खुलासा शमिताने केला आहे.
अधिक वाचा-
करण जोहर होस्ट करत असलेल्या बिग बॉस ओटीटी सध्या मोठ्या चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासून वादाचा भडका उडत आहे. त्यातही शमिता शेट्टी, प्रतीक सेहजपाल, दिव्या अग्रवाल या तिघांमुळे BigBoss च्या घरात नेहमी वाद सुरू आहेत.
अधिक वाचा-
किचनमधील कामावरून शमिता शेट्टीचं प्रतीकशी कडाक्याचं भांडण झालं होतं.
अधिक वाचा-
आता शमिताने केलेल्या एका वक्तव्याने BigBossच्या घरता नवीच ठिणगी पडली आहे. "मला त्याची लायकी माहिती आहे.
माझ्याशी त्याने एकदा मर्यादा ओलांडून चुकीचं वर्तन केलं होतं. त्यामुळे मला त्याच्याशी दूरच राहायचं आहे. जेव्हा मी त्याला या स्टेजवर पाहिलं, तेव्हा त्यामुळेच मी त्याच्याशी असं वागले," असं शमिताने म्हटलं आहे.
शमिता आणि दिव्या हिच्या संवादातून हा प्रकार समोर आला आहे.
पण शमिताने नेमकी घटना काय हे मात्र सांगितलेलं नाही.
बिग बॉस १५ म्हणजे बिग बॉस ओटीटी हा शो 'वूट'वर सुरू झाला आहे. करण जोहर सध्या हा शो होस्ट करत आहे. शिल्पाच्या बहिणीने स्पर्धक म्हणून शोमध्ये एन्ट्री केली आहे.
याबाबत शमिता म्हणाली की, राज कुंद्रा प्रकरणामुळे तिच्या मनात दोन विचार सुरू होते.
या शो मध्ये जावे की नाही, असा विचार मनात घोळत होता. पण, येणारा काळ चांगला असो वा वाईट असो. आपण श्वास घेणं तरी सोडत नाही. मग, आपल्या कामातही सातत्य असावं.
हे देखील वाचा-
पाहा व्हिडिओ – सरू आजीला शिव्या कुणी शिकवल्या ? | Actress Rukmini sutar Exclusive