लोकल पास घेण्यासाठी डोंबिवलीत चाकरमान्यांची गर्दी | पुढारी

लोकल पास घेण्यासाठी डोंबिवलीत चाकरमान्यांची गर्दी

कल्याण; पुढारी वृत्तसेवा : लोकल पास : लोकलचा मासिक रेल्वे प्रवास पास काढण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी झाली. लोकलचा मासिक रेल्वे प्रवास पास मिळवण्यासाठी रेल्वेने नोकरी व्यवसायासाठी मुंबईकडे जाणाऱ्या नोकरदार व चाकरमान्यांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.

अधिक वाचा – 

railway pass
लोकल रेल्वे पास

रेल्वे प्रवास पाससाठी संबंधित कागदपत्रांची पडताळणीसाठी केडीएमसीने डोंबिवली रेल्वे स्थानकात चार मदत केंद सुरू केली आहेत .
मासिक रेल्वे प्रवास पाससाठी गैरसोय होऊ नये मदत केंद्रे सुरू करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

अधिक वाचा –

महापालिकेने डोंबिवली रेल्वे स्थानकात पूर्व पश्चिमेकडील रेल्वे तिकिट खिडकीजवळ चार मदत केंद्रे सुरू केली आहेत. १३ कर्मचारी मदतीला तैनात केले आहेत.

अधिक वाचा –

कोविड प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्याच्या वैध प्रमाणपत्राची प्रत (हार्ड कॉपी), त्यासोबत छायाचित्र ओळखपत्र पुरावाच्या कागदपत्राची पडताळणी केली जात आहे. संबधित सर्व कागदपत्रांची पूर्तता असल्यावरच रेल्वेकडून पास दिला जाणार आहे.

मदत केंद्राला रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. पास संदर्भात लागणाऱ्या कागद पत्रांची कश्या प्रकारे पडताळणी करायची या बाबत सूचना रेल्वेचे उपनिरबंधक व्यवस्थापक (DRM) यांनी केल्याडोंबिवली स्टेशन मास्टर,व रेल्वेचे अन्य अधिकारी या वेळी उपस्थित होते.

हे देखील वाचलंत का? –

पाहा व्हिडिओ – बदलती शिक्षण पद्धती स्वीकारा – डॉ. अरुण पाटील | Dr Arun Patil, Pudhari Edudisha Lecture 

Back to top button