पावभाजी चमचमीत लालभडक घरच्याघरी कशी कराल? | पुढारी

पावभाजी चमचमीत लालभडक घरच्याघरी कशी कराल?

पुढारी ऑनलाईन डेस्क:  पावभाजी म्हणले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पण कोरोनामुळे हॉटेल बंद, पार्सल आणायचे तर संसर्गाचा धोका अशा अनेक कारणांनी मनाला मुरड (खरं तर तोंडाला मुरड) घालावी लागते.

हीच पावभाजी घरात करायला गेले की तिचा रंग फिकट होतो आणि खायचा मूड जातो. मग ती तिखट न करता लालभडक, चमचमीत कशी करायची याच्या या साध्या सोप्या टिप्स.

मित्र- मैत्रिणींबरोबर जा किंवा घरच्यांबरोबर पावभाजी खायची म्हटले की कुणीही नाही म्हणत नाही. किंबहुना पावभाजी खाण्यासाठी खास असे कारण लागत नाही.

घरच्या घरी पावभाजी करायची तर बरंच साहित्य जमा करावे लागते. मात्र जर आपण काही सोप्या टिप्स वापरून पावभाजी केली तर ती अगदी हॉटेलमध्ये मिळते त्यापेक्षाही चवदार होऊ शकते.

पावभाजी
file photo

काय करावे

पावभाजी करण्यासाठी तुम्हाला उकडलेला बटाटा, फ्लॉवर, हिरवे वाटाणे, टोमॅटो, आले-लसूण पेस्ट, बटर, लाल सिमला मिरची पेस्ट घ्या.

थोडे जिरेही घ्यावेत.

यात बटाट्याचे प्रमाण जास्त असावे. त्याखालोखाल हिरवे वाटाणे किंवा ग्रीनपीस, फ्लॉवर, टोमॅटो असावे.

हिरवी सिमला मिरची घेतली तरी चालेल.

ज्या दिवशी पावभाजी करायची त्याच्या आधी दोन तास लाल सिमला मिरची पाण्यात भिजत घालावी. किंवा ती आदल्या दिवशी रात्री घातली तरी चालेल.

ती पूर्ण भिजलेली मिरचीचे आवरण अलगद काढता येईल. या मिरचीचे आवरण मिक्सरमध्ये वाटून घ्या.

त्यात थोडे पांढरे तीळ घातले तरी चालेल.

कसे करावे

प्रथम मोठ्या भांड्यात बटर टाकून घ्यावे. ते किती टाकवे ते तुमच्या पावभाजीच्या प्रमाणावर आहे. बटरमध्ये थोडेसे जिरे टाकावे.

त्यात कांदा, हिरवी सिमला मिरची, ग्रीनपीस आणि टोमॅटो चांगला भाजून घ्यावा. नंतर त्यात बटाटा घालावा.

हे मिश्रण चांगले मिसळल्यानंतर त्यात आपण जी लाल सिमला मिरचीची पेस्ट केलीय ती प्रमाणात टाकावी.

या पेस्टमुळे तुमची पावभाजी प्रमाणात तिखट होईल, शिवाय तिला चांगला रंगही येईल. त्यानंतर प्रमाणात मीठ टाका.

हे मिश्रण लहानशा क्रशरने बारीक करा. थोडेसे पाणी टाकून पुन्हा बारीक करा.

पावभाजी
file photo

रंगाचा वापर टाळा

हे मिश्रण चांगले बारीक झाले की, चांगले शिजू द्या. घरात जर मोठा तवा असेल तर अतिशय उत्तम पद्धतीने तुम्हाला ही पावभाजी करता येईल.

लक्षात घ्या की तुम्हाला भाजी तिखटही नको पण तिला चांगला रंग यायचा असेल तर अनेक पद्धती आढळतात.

बाजारात मिळणारा कृत्रीम रंग पावभाजीला रंग आणू शकतो पण तो आरोग्याला घातक असतो. त्यामुळे त्याकडे वळूच नका.

त्याऐवजी लाल सिमला मिरचीचा वापर करा. याचे मुख्य कारण म्हणजे ही मिरची कमी तिखट असते. शिवाय तिचा रंग लालभडक असतो.

त्यामुळे तुम्हाला हवी असलेली चवही मिळेल आणि तिचा रंगही.

Back to top button