राष्ट्रीय

डोळे काढू, हात कापू; भाजप खासदार शर्मा यांचे वादग्रस्त वक्तव्य

backup backup

हरियाणातील माजी मंत्री मनीष ग्रोव्हर यांना हात लावायचा प्रयत्न केला तर हात कापून डोळे काढू, असे वादग्रस्त वक्तव्य  भाजप खासदार अरविंद शर्मा यांनी केले आहे. रोहतक येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

भाजपाने रोहतकमध्ये काँग्रेसविरोधात आंदोलन केले. शेतकरी आणि गावकऱ्यांनी आंदोलन केल्यामुळे मनीष ग्रोवर आणि इतर अनेक भाजपा नेते शुक्रवारी रोहतकमध्ये एका मंदिराच्या संकुलात काही तास बंदिस्त होते. याचा संदर्भ देत शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

रोहतक येथील एका मंदिरात मनीष ग्रोवरसह भाजपाच्या काही नेत्यांना ओलीस ठेवण्यात आल्यानंतर अरविंद शर्मा यांनी धमकी दिली आहे. या घटनेमागे काँग्रेस असून जर मनीष ग्रोवरकडे कोणी डोळे वर करून पाहिलं तर डोळे काढून टाकू. कोणी हात उचलला तर तो हात आम्ही कापून टाकू, आम्ही कुणालाही सोडणार नाही, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा शेतकऱ्यांनी निषेध केला असून त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

भाजप खासदार वादग्रस्त वक्तव्य : सत्तेसाठी काँग्रेसचा कट

काँग्रेस सत्तेसाठी लाचार आहे. हे सर्वकाही सत्तेसाठी सुरू आहे. काँग्रेस आणि पक्षाचे नेते भूपेंद्र हुड्डा आणि त्यांचा मुलगा दीपेंद्र हुड्डा हा ग्रोवर यांना लक्ष्य करत आहे, असा आरोप शर्मा यांनी केला. ते म्हणाले, मनीष ग्रोवरमुळे आम्ही रोहतक लोकसभा जागा जिंकली यात शंका नाही. सत्तेसाठी काँग्रेस कट रचत आहे;  पण पुढील २५ वर्षांत काँग्रेसची सत्ता येईल हे विसरून जा' असे अरविंद शर्मा यांनी म्हटले आहे.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT