Latest

Malaika Arora : मलायकाचा अर्जुनच्या हातात हात, शर्टचं बटण उघडं अन्…

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ती प्रत्येक दिवशी आपले वेगवेगळ्या पोजमधील हॉट फोटो शेअर करत असते. मलायकाने सोशल मीडियावर नुकतेच काही लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे.

मलायका अरोरा (Malaika Arora) आणि तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर खूपच दिवसांनी सध्या मुंबतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाले. मलायका आणि अर्जुन दोघांनी एकमेकांच्या नात्याबद्दल अजूनही खुलासा केलेला नाही, परंतु, ते दोघेजण अनेकवेळा डिनर डेटवर जाताना दिसतात.

हातात हात घालून रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट

यावेळी मलायका अर्जुनच्या हातात हात घालून रेस्टॉरंटच्या बाहेर पडताना दिसली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत मलायकाचा हटके अंदाज पाहायला मिळाला. या दरम्यान मलायका मिड राइज डेनिम मेड कैप्रीसोबत पांढऱ्या रंगाच्या टिशर्टमध्ये दिसली. तर अर्जुन काळ्या रंगाचा टी शर्ट आणि जिन्समध्ये दिसला.

या व्हिडिओमुळे मलायका आणि अर्जुन यांच्याबाबतच्या चर्चांना उधाण आले. खास करून, मलायकाने यावेळी आपल्या शर्टचे बटण उघडे ठेवल्याचे दिसले. तर अर्जुनच्या टी शर्टवर 'Wasted Youth' असे लिहिले आहे. यामुळे दोघांच्या या वेशभूषाची जोरदार चर्चा होत आहे.

याआधी मलायकाने नुकतेच चमकदार जांभळ्या रंगाच्या जंपसूटमध्ये फोटोशूट केले होते. या फोटोमध्ये ती खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. यासोहत चाहत्यांनी फायर, प्रेमाचा आणि हास्याचे ईमोजी शेअर केला आहे.

मलायका सध्या चित्रपटांमध्ये दूर असून ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. मलायकाच्या 'छैय्या छैय्या', 'अनारकली' आणि 'मुन्नी बदनाम' यासारख्या गाजलेल्या गाण्यांनी प्रकाश झोतात आली.

हेही वाचलंत का? 

(video: bollywoodpap and viralbhayani photo : malaikaaroraofficial वरून साभार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT