ठाणे; पुढारी वृत्तसेवा: मुंब्रा परिसरात ईदसाठी आणण्यात आलेल्या १५ बकऱ्यांचा बुडून मृत्यू झाला. मुंब्रा येथील एका गाळ्यात या बकऱ्यांना ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणी चार फुटांपेक्षा अधिक पावसाचे पाणी शिरल्याने बकऱ्या बुडाल्या. या घटनेतील आणखी १४ बकऱ्यांना वाचण्यात यश आले आहे. विक्रीचा सौदाही झाला होता मात्र, बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने व्यापाऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे.
अधिक वाचा
पावासामुळे ठाणे शहरासह आजूबाजूच्या परिसरात पाणीच पाणी झाले आहे. मुंब्रा येथील दोस्ती आणि नाइस पार्क जवळील परिसरात काही बैठे गाळे आहेत. या गाळ्यात ईद -कुर्बानीसाठी एका व्यापाऱ्याने तब्बल २९ बकऱ्या आणल्या होत्या.
अधिक वाचा
बकऱ्यांचा रविवारी (दि.१८) रोजी व्यवहारही झाला होता. सोमवारी (दि. १९) रोजी बकरे नेण्यासाठी लोक येणार होते. त्यातच रात्री अचानक गाळ्यात पावसाचे पाणी भरण्यास सुरुवात झाली. हे पाणी तीन ते चार फुटांवर गेले.
पाणी वाढल्याने समजताच गाळ्यात ठेवलेल्या बकऱ्यांना दुसरीकडे हलविण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांनी केला. परंतु पावसाचे पाणी जास्तच वाढत गेल्याने या घटनेत १५ बकऱ्या बुडाल्या.
अधिक वाचा
या दरम्यान इतर १४ बकऱ्यांना वाचविण्यात यश आले आहे. बकऱ्याचा मृत्यू झाल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशाप्रकारे पावसाचा फटका व्यवसायिकांना बसत आहे.
हेही वाचलंत का?
पाहा : खारघर : धबधब्यावर अडकलेल्या ११८ पर्यटकांची सुटका..!