कपिलेश्वर मंदिरात ५१ किलो बेळगावी कुंद्यापासून बनवली आरास | पुढारी

कपिलेश्वर मंदिरात ५१ किलो बेळगावी कुंद्यापासून बनवली आरास

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : दक्षिण काशी म्हणून परिचित असलेल्या कपिलेश्वर मंदिरात बेळगावच्या प्रसिद्ध कुंद्यापासून आकर्षक आरास करण्यात आली आहे. सोमवारचे औचित्य साधून ५१ किलो कुंद्यापासून तयार करण्यात आलेली ही आरास भक्तांसाठी पर्वणी ठरली आहे.

कपिलेश्वर मंदिरात आषाढ महिन्यात दर सोमवारी अशी वेगळी आरास करण्याचे देवस्थान ट्रस्ट कमिटीने नियोजन केले आहे. गेल्या सोमवारी ओल्या खजुरापासून तयार करण्यात आलेली आरास लक्षवेधी ठरली होती. आज ५१ किलो कुंद्यापासून तयार केलेली आरास असेच आकर्षण ठरले आहे.

अधिक वाचा :

ही आरास करण्यास तब्बल चार तासाचा अवधी लागला. या नाविन्यपूर्ण कलाकृतीचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांची लगबग सुरु आहे. रात्री दहा वाजेपर्यंत आरास दर्शनासाठी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. शहरातील भाविक नियमावलीचे पालन करत आरास दर्शन घेत आहेत.

मंदिरातील सेवेकरी सचिन आनंदाचे, गणेश देवर, अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, राजू भातकांडे, अभिजीत चव्हाण, विवेक पाटील, राहुल कुरणे यांच्या सहकार्याने ही आरास साकारण्यात आली.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : अभिनेते सचिन खेडेकर यांच्याशी खास गप्पा

Back to top button