मुंबई; पुढारी वृत्तसेवा: भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना मुंबईत पावसामुळे होत असलेल्या बदलावर भाष्य केले. यासोबत मुंबईसाठी भविष्यातील धोक्याचा इशारा तर नाही ना? याबाबत तातडीने विचार होण्याची गरज आहे, अशी अपेक्षादेखील आशिष शेलार यांनी या वेळी व्यक्त केली.
भांडूप जलशुद्धीकरण केंद्रात पहिल्यांदाच पाणी शिरले. समुद्राला भरती नसताना मिठी नदीला पूर आला. ओहोटी असताना मिठी नदीचे पाणी ओसरत नाही. गेली २५ वर्षे मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे. या २५ वर्षात असं कधीच घडले नाही. त्यामुळे हे मुंबईसाठी भविष्यातील धोक्याचे इशारे तर नाही ना? याबाबत तातडीने विचार होण्याची गरज आहे, अशी अपेक्षा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली.
अधिक वाचा
आमदार शेलार यांनी आज सोमवारी (दि.१९) रोजी माध्यमांशी बोलताना मुंबईत पावसामुळे होत असलेल्या बदलावर भाष्य केले. मुबईत धोकादायक विदारक चित्र निर्माण झाले आहे. कालपासून मुंबईची स्थिती चिंताजनक असून मुंबई धोकादायक उंबरठ्यावर असल्याचं दिसून येत आहे.
मिठी नदी समुद्राकडे पाणी घेऊन जात असते. समुद्राला भरती आली तरच मिठी नदी भरते. काल पहिल्यांदा समुद्राला भरती नसताना मिठी नदीला पूर आला होता. लोकांच्या घरात पाणी शिरले होते. याचा अर्थ काय? तर भांडूपच्या जलशुद्घीकरण केंद्रातही पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे हे संकेत आहेत. हे धोकादायक आहे, असेही आशिष शेलार यांनी सांगितले.
अधिक वाचा
मुंबईत या दोन घटना पहिल्यांदाच घडल्या. लोकप्रतिनिधी म्हणून मी गेली २५ वर्षे काम करत आहे. माझ्या कार्यकाळात असं कधी पाहिले गेले नाही. यावेळी दिसणारे बदल हे धोकादायक वाटत आहेत. या घटना म्हणजे, मुंबईवर येऊ घातलेल्या मोठ्या संकटाचे संकेत तर नाही ना?, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांनी तातडीने नगरसेवक, आमदार, खासदार, पालिकेचे अधिकारी आणि या विषयातील तज्ज्ञांची बैठक बोलावून आढावा घ्यावा. नंतर याबाबत हळहळ करण्यात अर्थ नाही. ज्या अधिकाऱ्यांना हे धोके कळले नाहीत. त्यांचीच काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन आढावा घेतला आहे, असेही ते म्हणाले.
अधिक वाचा
एवढे सगळे अधिकारी असताना मुंबईत दुर्घटना झाल्याच कशा? असा सवाल करताना दुर्घटना झाल्यानंतर पालिकेत प्रस्ताव होतो. आता नरबळी घेतल्यावर विकासाचे प्रस्ताव करणार आहात का?; असा सवालही शेलार यांनी केला.
हा राजकारण करायचा मुद्दा नाही. लोककारण करावं लागेल. पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे काल बळी गेले. पालिकेने ११२ टक्के नालेसफाईचा दावा केला होता. पण, तरीही ३१ लोक दगावले. त्याला जबाबदार कोण? ही नालेसफाई नाही. तर हात सफाई आहे. मिठी नदीबाबतही आम्हाला शंका आहे, असे ते म्हणाले.
मुंबईतील धोकादायक भिंती, कट्टे, इमारती, डोंगराळ भाग याचं महिन्याभरापूर्वीच सर्वेक्षण करायला हवं होतं. पण, पालिकेने हे सर्वेक्षण केलं नाही. पालिका नागरिकांचं ऐकत नाही. नगरसेवकांचं ऐकत नाही. त्यांना जनतेला मृत्यूच्या दारात पाटावर आणून ठेवायचं आहे काय? शिवसेनेच्या पालिकेने हे करून ठेवलंय, अशी टीकाही त्यांनी केली.
हेही वाचलंत का?
पाहा : खारघर : धबधब्यावर अडकलेल्या ११८ पर्यटकांची सुटका..!