

जळगाव; पुढारी ऑनलाईन : कोरोना निर्बंधांमुळे यावर्षीही पंढरपूर वारी साठी संत मुक्ताईंची पालखी ही शिवशाही बसने आज ( दि. १९ ) सकाळी पंढरपूरकडे रवाना झाली. मुक्ताईच्या पालखी बरोबर मोजक्याच वारकऱ्यांना पंढरपूरला जाता आले.
पंढरपूर वारी ला शेकडो वारकरी विविध पालकांबरोबर जात असतात. मात्र कोरोनामुळे यावर बंदी आल्याने काही मोजक्याच वारकऱ्यांना पंढरपूर पालखीबरोबर जाता येत आहे.
परंपरेने १४ जूनला संत मुक्ताईंची पालखी कोथळी येथील जुन्या मंदिरातून प्रातिनिधिक स्वरूपात प्रस्थान होऊन नवीन मंदिरात मुक्कामाला विसावली होती.
अधिक वाचा :
संत मुक्ताईंच्या पालखीने महिन्याभराच्या मुक्कामानंतर आज सकाळी चार वाजता शिवशाही बसने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले.
पंढरपूर वारी साठी आदिशक्ती संत मुक्ताईं पालखी सोहळा मुक्ताईनगर येथून आज (सोमवारी) पहाटे ४ शिवशाही बसने रवाना झाला. कोरोनामुळे मर्यादा असल्याने यावर्षी देखील पालखी सोहळ्यात ४० वारकऱ्यांचा सहभाग आहे.
या सर्व वारकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात लसीकरण झालेले व अहवाल निगेटिव्ह आलेल्या वारकऱ्यांना पालखी सोहळ्यात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली.
त्यात संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, पालखी सोहळा प्रमुख, पुजारी, मानकरी, सेवाधारी, संत मुक्ताबाई फडावरील महाराज मंडळी, गायक, वादक, कीर्तनकारांसह सद्गुरु सखाराम महाराज, सद्गुरु मुकुंद महाराज, सदगुरू झेंडुजी महाराज, सद्गुरु दिगंबर महाराज, सद्गुरु पंढरीनाथ महाराज, सद्गुरु निवृत्ती बाबा वक्ते, सद्गुरु दत्तूजी महाराज, सद्गुरु मांगोजी महाराज, सारंगधर महाराज यांचा समावेश आहे.
अधिक वाचा :
शेकडो वर्षांच्या वारीच्या परंपरेला खंड नको म्हणून राज्य शासनाकडून पायी वारीऐवजी बसमधून पंढरपूर वारी करण्यसाठी मोजक्या वारकरी प्रतिनिधींना परवानगी दिली.
त्यानुसार यावर्षी संत मुक्ताईंच्या पादुका शिवशाही बसने पंढरपूरला रवाना झाल्या.
हा पालखी सोहळा बसने बुलडाणा, जालना, बीड, येरमाळा, बार्शी मार्गे आज सायंकाळी पंढरपुरात दाखल होईल, अशी माहिती संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांनी दिली.
अधिक वाचा :
पाहा व्हिडिओ : भात लावणी