श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चलपादुका पोहोचल्या साताऱ्यात | पुढारी

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चलपादुका पोहोचल्या साताऱ्यात

लोणंद; शशिकांत जाधव: श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका घेऊन आळंदीहून पंढरपूरकडे माऊलींचा रथ रवाना झाला. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका घेऊन निघालेल्या शिवशाही माऊलींचा रथ आज सोमवारी (दि. १९) सकाळी साडेअकराच्या सुमारास पोहोचला.

पुणे जिल्हयातून सातारा जिल्ह्यात निरा नदीवरील पुलावरून पाडेगाव ता. खंडाळा गावचे हद्दीत प्रवेश केला. श्री. संत ज्ञानेश्वर महारांज यांच्या पादुका यांच्या आळंदीतून पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या.

श्री. संत ज्ञानेश्वर महारांजांच्या पादुकांचे स्वागतच जलधारांनी केल्याचे चित्र साताऱ्यात पहावयास मिळाले. तर लोणंद येथील अहिल्यादेवी चौकात माऊलींनी पाऊने बारा वाजता प्रवेश केला. त्यावेळी देखील तुरळक पावसाच्या सरी बरसत होत्या.

अधिक वाचा 

गत वर्षाप्रमाणे यावर्षीही ना हरिनामाचा जयघोष होता, ना माऊलींचा रथ होता, ना दिंड्या होत्या, ना वारकरी होते, ना टाळ, मृंदुगाचा गजर होता, सर्व कसे सुने सुने होते.

कोरोनामुळे श्री. संत शिरोमनी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा रद्द झाल्याने आषाढी एकादशीसाठी माऊलींच्या पादुका शिवशाही एसटीमधून नेण्यात आल्या.

अधिक वाचा 

माऊलींच्या स्वागताला लाखोंचा वैष्णव समाज, भाविक असतात. पण, आजच्या सोहळ्यात पुढे- मागे पोलिस, प्रशासन, रुग्णवाहिका आदी गाड्यांच्या ताफ्यामध्ये माऊलींच्या पादुका असलेली शिवशाही होती.

अधिक वाचा 

हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी गर्दी केली होती. त्यातही माऊली, माऊली, माऊलीचा जयघोष ऐकावयास मिळाला.

हेही वाचलंत का?

पाहा : ज्ञानेश्वरीत भागवत गीतेच्या अर्थाचा विस्तार | डॉ. सदानंद मोरे भाग-18

 

Back to top button