मासुंदा तलाव ओव्हर फ्लो; ठाणेकरांनी लुटला मासेमारीचा आनंद | पुढारी

मासुंदा तलाव ओव्हर फ्लो; ठाणेकरांनी लुटला मासेमारीचा आनंद

ठाणे; पुढारी वृत्तसेवा: सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे ठाण्याची चौपाटी असलेल्या मासुंदा तलाव सोमवारी (दि.१९)  सकाळी ओव्हर फ्लो झाला.

मासुंदा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने ठाण्याची मुख्य बाजारपेठेत पाणी तुंबल्याने तेथील पाणीही रस्त्यावर पाणी आले. यामध्ये चिंतामणी चौकातून ठाणे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचले. याचा परिणाम वाहतूकीवर होताना दिसून आला.

अधिक वाचा 

मासुंदा तलावातील पाणी बाहेर येत असल्याने त्या पाण्याबरोबर तलावातील काही मासेही बाहेर आले होते. त्यामुळे ठाणेकर नागरिकांनी मासेमारीचा आनंद लुटला.

 काही नागरिकांनी एकमेकांच्या अंगावर पाणी उधळत पावसाचा आनंद घेतला. यासोबत येथील बाजारपेठेतील भाजीपाला आणि चिखल ही तलावाच्या पाण्यात जाताना दिसत होते.

अधिक वाचा 

ठाणे येथे पावसाचा जोर कायम

शनिवारी रात्रीपासून पावसाने चांगला जोर धरला आहे. उघडझाप करत दोन दिवसात पावसाने दमदार बॅटिंग सुरूच ठेवली आहे. सोमवारीही पावसाचा जोर कायम होता.

सकाळी ८.३० ते ९.३० वाजण्याच्या सुमारास ४२.४२ मिमी तर त्या नंतरच्या एक तासात १६ मिमी पाऊस झाला. त्यानंतर ही पावसाचे बरसणे सुरू होते.

गेल्या चोवीस तासात १६१.८२ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यामुळे सखल भागात पाणी साचले होते.

अधिक वाचा 

पाणी तुंबण्याच्या एकूण २३ तक्रारी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे नोंदविण्यात आल्या आहेत. यामध्ये कळवा, कोपरी, वागळे इस्टेट, मुंब्रा, नौपाडा येथील वेगवेगळ्या भागात पाणी तुंबले होते.

 शहरात पाच ठिकाणी सरंक्षण भिंती कोसळल्या आहेत. त्यामध्ये घोडबंदर रोड येथील कॉसमॉस लाऊंज येथील भिंत पडल्याने ५ चारचाकी तर ४ दुचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा : खारघर : धबधब्यावर अडकलेल्या ११८ पर्यटकांची सुटका..!

Back to top button