पुणे

ज्ञानवापी प्रकरणी भागवतांच्या भूमिकेला आठवले यांचे समर्थन

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

एक वेळ अशी होती की, आपला सगळा देश बुद्धिस्ट होता. त्यानंतर हिंदू झाला नंतर मोगल आले आणि आपले लोक मुस्लिम झाले. त्यामुळे ज्या ठिकाणी मंदिर होती. त्या ठिकाणी मशिदी आल्या आहेत. पंरतु आपण आता बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातील भारत उभा करायचा असेल, तर प्रत्येक गोष्टीमध्ये वाद निर्माण करणे योग्य नाही. मोहन भागवत यांनी जी भूमिका मांडली. ती योग्य असून प्रत्येकाने इतिहास उकरून काढण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्य सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

ज्ञानवापीनंतर देशभरात नव्या वादाला सुरुवात झाली आहे. मोहन भागवत यांनी, ज्ञानवापी प्रकरणी न्यायालय निर्णय देईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे, शिवलिंग शोधण्याचीआणि दरदिवशी नवा वाद निर्माण करण्याची गरज नाही, अशी भूमिका मांडली होती. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर आठवले बोलत होते.

ते म्हणाले, आपला जो राम जन्म भूमीचा प्रश्न होता. त्यासाठी अनेक वर्ष लढा सुरू होता. सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमांतून यश मिळाले आहे. सध्या राम जन्म भूमीवर चांगल्या प्रकारे बांधकाम सुरू आहे. प्रत्येक मशिदीमध्ये पिंड हा इतिहास खरा आहे. मात्र मुस्लिम बांधव देखील आपले बांधव आहेत. त्यामुळे भागवतांनीमांडलेलीभूमिका योग्य आहे.

राज्यसभेसंदर्भात फडणवीस, पाटील निर्णय घेतील

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महा विकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली. त्यावर रामदास आठवले म्हणाले की, त्या बद्दल मला काही माहिती नाही. यावर काय निर्णय घ्यायचा ते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील घेतील.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT