Bhor election Pudhari
पुणे

Bhor election: भोरमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसची लढत; पाच दशकांनंतर निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण

पाच दशकांचा राजकीय इतिहास बदलणार?

पुढारी वृत्तसेवा

अर्जुन खोपडे

भोर: सुमारे पाच दशकानंतर भोर नगरपरिषदेची वैशिष्ट्‌‍यपूर्ण निवडणूक होणार असल्याचे चित्र आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग््रेास यांच्यात ‌’काटे की टक्कर‌’ पाहायला मिळेल. केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता असली तरी येथील निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून मल्ल मैदानात उतरवणार असल्याचे चित्र आहे.

लोकसभेचा तीन वेळचा अपवाद वगळता मागील पाच दशके भोर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांपासून ते आमदारकीपर्यंतची निवडणूक थोपटे विरुध्द पवार अशीच झाल्याचे पाहायला मिळते. त्यामध्ये अगदी ग््राामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, खरेदी-विक्री संघ , बाजार समिती, तालुका देखरेख अथवा साखर कारखाना यांचा समावेश आहे. हीच परिस्थिती पुन्हा पाहायला मिळणार असून संग््रााम थोपटे काँग््रेासऐवजी भाजपावासीय म्हणून मैदानात उतरणार आहेत.

दुसरीकडे 2023 मध्ये मुदत संपलेल्या सभागृहातील नगराध्यक्षा निर्मला आवारे, त्यांचे पती माजी उपाध्यक्ष रामचंद्र आवारे यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, हा थोपटेंना मोठा धक्का मानला जातो. हा देखील या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. थेट नगराध्यक्ष व दहा प्रभागातील 20 नगरसेवकांच्या जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आहे. त्यासाठी किमान 6 ते 7 जण रिंगणात आहेत. तर नगरसेवकांच्या प्रत्येक प्रभागात किमान 10 ते 15 जण इच्छुक असून अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. भाजपा, राष्ट्रवादी कॉंग््रेास शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग््रेास, शिवसेना, शिवसेना (उबाठा), रिपाइंचे गट, अपक्ष अशी बहुरंगी लढतीचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तालुक्यात कॉंग््रेासला कोणी पदाधिकारी नसल्यामुळे शहरातून पक्ष हद्दपार होणार किंवा कसे याचेही उत्तर या निवडणुकीतून मिळणार आहे.

विविध बॅनर, कटआऊट अन्‌‍ भेटवस्तूंचे वाटप

हक्काचा माणूस, जनतेचा सेवक, मतदारराजाचा सेवक, आपलाच माणूस, निवडून आलेला नगरसेवक, जनतेच्या मनातील नेता, काम करणारा नेता, घरातील नगरसेवक, सर्वसामान्य कुटुंबातील कणखर नेतृत्व, आपलाच जनसेवक आदी बिरुदावलीचे बॅनर, कटआऊट, होर्डिंग्ज मागील काही महिन्यांपासून गल्लोगल्ली लागले आहेत. अनेक इच्छुकांनी वॉर्डमध्ये बसण्यासाठी बेंचचे वाटप केले. तर दिवाळी फराळ, भेटवस्तूचे वाटप केले आहे. मतदारांच्या मनात मात्र वेगळीच चर्चा आहे.

दबक्या आवाजात दराची चर्चा

केंद्र व राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी मतदारांना विविध योजनांद्वारे पैशांच्या माध्यमातून आपलेसे केल्याचे दिसते. त्यामुळे या निवडणूकीत पक्ष, उमेदवार कोण आहे, यापेक्षा जो कोणी मदत करेल त्यालाच कौल देणार, अशी चर्चा आहे. नगराध्यक्ष पाच ते सात तर नगरसेवक तीन ते पाच असा दर दबक्या आवाजात कानावर येत आहे. त्यामुळे मतदारांचा हा कौल कोण पूर्ण करणार त्यावर सर्व गणित आणि सत्तेची चावी अवलंबून आहे. कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल सर्वच प्रभागात होईल, असे बोलले जाते.

मागील पार्श्वभूमी

सन 1952 मध्ये भोर संस्थानमधील मंडळाची सत्ता होती. 1957 ला संयुक्त महाराष्ट्र चळवळ. 1962 ते 1967 लाल निषाण पक्ष आणि जनसंघ. 1967 ते 2013 पर्यंत (2004) काँग््रेासचा अपवाद वगळता शरद पवार यांच्या विचारधारेचे दिवंगत अमृतलाल रावळ यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता होती. 2013 पासून काँग््रेास अर्थात संग््रााम थोपटे यांच्याकडे आतापर्यंत सत्ता आहे. या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जंग-जंग पछाडूनही त्यांना नगरपरिषद ताब्यात घेता आली नाही. भाजपाने 2018 मध्ये मंत्र्यांची मोठी फौज मैदानात उतरवूनही त्यांना अनेक उमेदवारांच्या अनामत रकमा वाचवता आल्या नाहीत. थोपटे यांचे खंबीर नेतृत्वाखाली कॉंग््रेासने एकहाती सत्ता ठेवली होती. या वेळेस परिस्थिती वेगळी आहे. थोपटे हे भाजपवासीय झाले आहेत.

बहुरंगी लढतीचे चित्र

राज्यात महायुतीचे सरकार असले तरी भोरमध्ये थोपटेंच्या नेतृत्वाखाली प्रथमच मैदानात उतरणाऱ्या मल्लांची लढत अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या मल्लांबरोबर होणार आहे. त्यामध्ये थोपटेंची प्रतिष्ठा आणि भविष्यातील वाटचालीची दिशा स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे अजित पवारांनी काहीही करून नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी पुन्हा एकदा निर्धार केला आहे. त्यामुळे आमदार शंकर मांडेकरांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी सत्ता काबीज करून नगरपरिषदेत पाय रोवणार काय याचाही फैसला होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT