

पुणे: आंबील ओढा कॉलनी सानेगुरुजी नगर येथील पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत शनिवारी (दि. 15) सकाळी मीटर रूमला लागलेल्या भीषण आगीमुळे एकच खळबळ उडाली. याआधीही या वसाहतीत अशा तीन गंभीर घटना घडून गेल्या आहेत. तरीही महापालिका प्रशासनाने ना कुठली ठोस कारवाई केली, ना चौकशी; परिणामी मनपा कर्मचाक्तयांच्या घरांमध्ये उद्भवणाऱ्या वारंवार दुर्घटनांकडे प्रशासनाने पूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आग विझविण्यास विलंब झाल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. सुदैवाने जीवितहानी टळली. परंतु आश्चर्य म्हणजे, एवढी मोठी घटना घडूनही काही महापालिका अधिकाऱ्यांना याची कल्पना देखील नव्हती. या वसाहतीत सत्ताधारी भाजपचे तीन नगरसेवक वास्तव्यास असूनही कॉलनीची दुरवस्था कायम असल्याचा आरोप युवक काँग््रेासचे सामाजिक कार्यकर्ते सागर धाडवे यांनी केला.
या वसाहतीतील ढासळलेल्या इमारती, असुरक्षित विद्युतजाळे, गंजलेले मीटर बॉक्स, तसेच दुरुस्ती-अभावामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीमुळे प्रशासन आणि नगरसेवकांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रहिवाशांचे म्हणणे आहे की, वसाहतीतील समस्या वर्षानुवर्षे जशाच्या तशाच आहेत. निधी खर्च दाखवला जातो, पण बदल काहीच दिसत नाही.
कोटी कोटींचे टेंडर कुठे जातात?
युवक काँग््रेासचे सागर धाडवे म्हणाले, मनपा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. धाडवे म्हणाले, मनपा वसाहतींच्या दुरुस्ती व देखभालीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढले जातात. मात्र वसाहतीची स्थिती जैसे थे आहे. एवढा निधी कुठे जातो? ठेकेदार आणि सत्ताधाऱ्यांचे संगनमत मनपा कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे. पूर्वी घडलेल्या आगींचे पंचनामे झाले नाहीत, चौकशी नाही, कारवाई नाही. हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे ज्वलंत उदाहरण आहे.
कॉलनीला जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जाते का?
कर्मचारी शहराची सेवा बजावतात; पण त्यांच्या राहत्या घरांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. वीज पुरवठ्याची धोकादायक परिस्थिती, दुरुस्तीची अभावग््रास्त अवस्था, सुरक्षा उपायांचा शून्य पाडलेला विचार, या सर्वांमुळे उद्भवणारा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. युवक काँग््रेासने या प्रकरणाची तत्काळ चौकशी, आगीचा पंचनामा, तसेच दुरुस्ती कामातील भष्टाचारावरील स्वतंत्र तपासणी करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.