पुणे : पुढारी वृत्तसेवा : तंत्रशिक्षण डिप्लोमा अर्थात् पॉलिटेक्निकच्या प्रवेशाला गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत आहे. यंदा राज्यभरातील 367 संस्थांमध्ये 69 हजार 705 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. गतवर्षी 62 हजार 122 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावर्षी पुणे, मुंबई आणि अमरावती, विभागाची प्रवेशाची टक्केवारी चांगली असल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाने दिली.
तंत्रशिक्षण डिप्लोमा प्रवेशासाठी यंदा राज्यभरात 367 संस्थांमध्ये 1 लाखांहून अधिक जागा होत्या. त्यापैकी 69 हजार 705 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. गतवर्षी 2020-21 या शैक्षणिक वर्षात 62 हजार 122 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. संस्था आणि सहसंचालकस्तरावर प्रवेशासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले आहेत. अभ्यासक्रमाचे महत्त्व आणि संस्थांची माहिती दहावीनंतरच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली, यामुळे गतवर्षी झालेल्या प्रवेशापेक्षा यंदा 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. राज्यभरात प्रवेशासाठी केलेले नियोजन आणि मार्गदर्शन यामुळे कोरोनाकाळातही पॉलिटेक्निकच्या जागांवरील प्रवेश तीन वर्षांत 30 टक्क्यांनी वाढले असून यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचेही मोठे सहकार्य लाभले असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
बारावीनंतरच्या तीन वर्षांसाठी असलेल्या फार्मसी पदविकेसाठी राज्यात 462 संस्था आहेत. त्यात यंदा उपलब्ध असलेल्या सर्व 30 हजार 49 जागांवर 100 टक्के प्रवेश झाले आहेत.
Rohit Sharma Captain : रोहित शर्मा होणार ODI चा कॅप्टन, द. आफ्रिका दौ-यासाठी BCCI संघाची घोषणा करणार