बारामती : एसीबीकडून लाचप्रकरणी हवालदार ताब्यात | पुढारी

बारामती : एसीबीकडून लाचप्रकरणी हवालदार ताब्यात

बारामती : पुढारी वृत्तसेवा : पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माणिक गदादे या पोलिस हवालदाराला बारामतीत ताब्यात घेतले आहे. त्यांची नेमणूक बारामती सत्र न्यायालयात गार्ड म्हणून करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयात ते कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची येथे गार्ड म्हणून नेमणूक झाली होती.

गदादे यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून एक स्काॅर्पिओ ओढून आणली होती. या वाहनाचा दरोड्याच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे त्यांनी वाहनमालकाला सांगत वाहन सोडण्यासाठी ५० हजाराच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार दिली होती. तक्रारीची खातरजमा केली असता गदादे यांनी तडजोडीअंती लाच मागितल्याचे समोर आले. त्यानुसार त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील प्रक्रिया सुरु आहे.

हेही वाचा

भाजपाने ओबीसी आरक्षण बुडवण्याच्या पापाचे प्रायश्चित घ्यावे : नाना पटोले

अभिनेते नाना पाटेकर गदिमा पुरस्काराचे मानकरी

फ्लेमिंगोनंतर उजनीत पट्टकदंब हंसांचे आगमन

दुसरा डोस देण्यात पुणे पिछाडीवर

Rohit Sharma Captain : रोहित शर्मा होणार ODI चा कॅप्टन, द. आफ्रिका दौ-यासाठी BCCI संघाची घोषणा करणार

बारामतीचे नगरसेवक किरण गुजर यांच्या गाडीला अपघात

Rahul Gandhi : आंदोलनादरम्यान ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू, सरकारकडे डाटा का नाही?; राहुल गांधींचा सवाल

Back to top button