उत्तर महाराष्ट्र

प्राधान्य कुटूंब योजनेत पात्र लाभार्थ्यांना रेशनकार्ड द्या : छगन भुजबळ

स्वालिया न. शिकलगार

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्राधान्य कुटूंब योजनेत पात्र लाभार्थ्यांना रेशनकार्ड द्या, असे आदेश  छगन भुजबळ यांनी आज दिले. लाभार्थ्यांना प्राधान्याने रेशनकार्ड उपलब्ध देण्सा‍याठी नियोजनबध्द कार्यक्रम राबविण्यात यावा, असेही छगन भुजबळ यांनी स्‍पष्‍ट केले. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठकीत ते बोलत होते.

येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, वैधमापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक बी. जी. जाधव, जिल्हा मार्केटींग अधिकारी एन. डी. मगरे उपस्थित होते.

विभागीय आयुक्त कार्यालयातील तहसीलदार साहेबराव शिंदे, वैधमापनशास्त्र विभागाचे निरिक्षक सी. डी. पालीवाल, रविंद्रभैय्या पाटील उपस्थित होते.

या वेळी मंत्री भुजबळ म्हणाले, अंत्योदय योजनेत जिल्ह्यातील दिव्यांग, विधवा, परितक्त्‌या, भुमीहीन शेतमजूर, अल्पभुधारक शेतकरी, दुर्धर आजारग्रस्त, आदिवासी व्यक्ती आहेत.

६० वर्षावरील वृध्द ज्यांना कुठलाही आधार नाही तसेच दारिद्रय रेषेखालील नागरिकांचा समावेश करावा. त्यांना या योजनेतंर्गत धान्याचा लाभ द्यावा.

ज्या लाभार्थींनी गेल्या वर्षभरात धान्य घेतलेलं नाही. त्यांची यादी तयार करावी.

गरजूंना धान्याचा लाभ देण्यासाठी धोरण आखावे. रेशनच्या मालाची अफरातफर होते, असे आढळून आल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या इशाराही त्‍यांनी दिला.

शिवभोजन केंद्राच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत.

शिवभोजन केंद्रांना नियमितपणे भेट देऊन तेथील तपासणी करावी.

गरजू नागरिकांची शिवभोजनची गरज लक्षात घेऊन केंद्र वाढविण्यात यावेत. प्रत्येक केंद्रासाठी इष्टांक एकसारखा राहील. याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.

भरडधान्य केंद्रावर नाव नोंदणीची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपत आहेत.

शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेतलीय. नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्‍याचे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, जिल्ह्यातील ५७ टक्के लाभार्थी प्राधान्य कुटूंब योजनेत समाविष्ट आहेत.

आगामी काळात तीन महिन्याच्या धान्याची उचल करावयाची आहे. त्यामुळे पाळधी येथील गोडावून भाड्याने घेणे आवश्यक आहे.

तसेच अमळनेर व पाचोरा येथे गोडावून बांधण्याचा प्रस्ताव सरकारला सादर केलेला आहे. त्यास मंजूरी मिळावी.

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना दिलेले ई-पॉस मशीन हे जुने झालेले आहेत. ते बदलून मिळावे. तसेच सध्या जिल्ह्यात ४८ शिवभोजन केंद्र सुरु आहे. त्यामध्ये दररोज ४६०० थाळ्यांचे वाटप करण्यात येत आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांनी सांगितले.

जिल्ह्यात सध्या १७ भरडधान्य खरेदी केंद्र सुरु आहे. नावनोंदणीसाठी मुदत वाढून मिळण्याची मागणी केली आहे.

ही मागणी जिल्ह्यातील शेतकरी करीत असल्याचे जिल्हा मार्केटींग अधिकारी मगर यांनी बैठकीत सांगितले.

हेही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT