

कराड; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे कराड विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार आनंदराव पाटील, माजी आमदार मदनदादा भोसले, भाजप नेते डॉक्टर अतुल भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांच्यासह जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शनिवारी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास नितीन गडकरी यांचे कराड विमानतळावर आगमन झाले
त्यांचे कराड विमानतळावर आगमन झाले त्यावेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवडक पदाधिकारी व्यतिरिक्त विमानतळ परिसरात कोणालाही एन्ट्री दिली जात नव्हती. स्वागत झाल्यानंतर ते कृष्णा हॉस्पिटलमधील कोरोना योद्ध्यांच्या गौरव समारंभासाठी रवाना झाले.