मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुती बहुमतात येऊनही अल्पमतात असल्याचे दिसून येत आहे. 18 प्रभाग समित्यांपैकी 8 प्रभाग समित्यांंवर ठाकरे बंधूंचे वर्चस्व असणार आहे तर सत्ता असूनही 8 समित्यांवर महायुतीचे अध्यक्ष निवडून येणार आहेत. एक ठिकाणी समसमान सदस्य संख्या असल्यामुळे ईश्वर चिठ्ठीवर अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. तर एका प्रभाग समितीवर एमआयएमचा अध्यक्ष बसणार आहे.
महापालिकेच्या 26 विभाग कार्यालयांच्या 18 प्रभाग समित्या आहेत. या 18 प्रभाग समित्यांपैकी 8 प्रभाग समित्यांवर ठाकरे बंधूंचे सर्वाधिक सदस्य राहणार आहेत. त्यामुळे या समित्यांच्या अध्यक्षपदी ठाकरे बंधूंचेच नगरसेवक विराजमान होणार आहेत. आठ समित्यांवर भाजपा -शिवसेना सदस्यांची संख्या जास्त असल्यामुळे येथे महायुतीची सत्ता येणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेमध्ये सत्ता आली नसली तरी अर्ध्या मुंबईवर ठाकरे बंधूंचेच वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट होते.
एमआयएमचे 8 नगरसेवक निवडून आल्यामुळे त्यांची गोवंडी एम पूर्व विभागात सत्ता येणार आहे. या प्रभाग समितीवर एमआयएमचे आठ सदस्य, तर भाजप-शिवसेनेचे सहा व ठाकरे यांचा एक नगरसेवक असणार आहे. भांडुप एस विभाग व मुलुंड विभाग प्रभाग समितीवर ठाकरे बंधू व महायुतीचे समसमान सदस्य राहणार आहेत. त्यामुळे येथील अध्यक्ष हा ईश्वर चिठ्ठीवर ठरणार आहे. त्यामुळे या समितीवर कोणत्या पक्षाचा अध्यक्ष विराजमान होणार याचा अंदाज बांधणे शक्य नाही. चिठ्ठीमध्ये ठाकरे बंधूंचा अध्यक्ष झाल्यास मुंबई शहर व उपनगरात महायुतीपेक्षा ठाकरेंचे वर्चस्व राहू शकते.
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत निवडून आलेले मनसेचे सर्वच्या सर्व नगरसेवक नवखे आहेत. गटनेते यशवंत किल्लेदारही पहिल्यांदाच नगरसेवक झाले आहेत. त्यामुळे मनसेचे नगरसेवक कशाप्रकारे पक्षाची बाजू मांडणार, याकडे मराठी माणसांचे लक्ष लागले आहे.
मुंबई महापालिका सभागृहातील मनसेच्या झिरो अस्तित्वानंतर आता शिवसेनेच्या पाठिंब्यावर मनसेचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत. पण या सहा नगरसेवकांमध्ये मुंबई महापालिकेच्या कामकाजाचे ज्ञान असलेला एकही नगरसेवक नाही. मनसेमध्ये वरिष्ठ असलेल्या यशवंत किल्लेदार यांच्यावर मुंबई महापालिका मनसे पक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु स्वतः किल्लेदारही पहिल्यांदाच नगरसेवक बनल्यामुळे पक्षाची बाजू महापालिका सभागृहात अभ्यासपूर्ण कशाप्रकारे मांडावी याचा कस लागणार आहे. किल्लेदार अभ्यासू असले तरी महापालिकेत असलेल्या दिग्गज नगरसेवकांसमोर त्यांचा किती टिकाव लागणार, हे येणाऱ्या काळात समजणार आहे.
2012 ते 2017 मुंबई महापालिका सभागृहात मनसेचा जोरदार आवाज होता.मात्र 2017 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेची मोठी घसरण झाली. या निवडणुकीत मनसेचे अवघे सात नगरसेवक निवडून आले. यातील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करत मनसेला धक्का दिला होता. आता सहा नगरसेवक पुन्हा निवडून आले आहेत.
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये यावेळी अभ्यासू नगरसेवकांची मोठी कमतरता भासणार आहे. त्यामुळे सभागृहात काँग्रेस आपली बाजू कशाप्रकारे मांडणार, हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.
मुंबई महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत काँग्रेसचे अनेक अभ्यासू नगरसेवक होऊन गेले. यात मुरली देवरा यांच्यासह आर. आर. सिंह, आर. टी. कदम, बळवंत पवार, किसन जाधव, बस्तीवाला, राजहंस सिंह, देवेंद्र आंबेरकर, रवी राजा, मोहसीन हैदर, विनोद शेखर व अन्य शेकडो नगरसेवकांची नावे घेता येतील. मात्र अलीकडेच पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या काँग्रेसच्या 24 नगरसेवकांमध्ये अभ्यासू नगरसेवकांची कमतरता दिसून येत आहे. महापालिकेत निवडून आलेल्या अश्रफ आजमी, अजंता यादव, मेहर मोहसिन हैदर, व अन्य दोन ते तीन नगरसेवक वगळता पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अशा नगरसेवकांना मुंबई पालिकेच्या कामकाजाचा अनुभव नाही.
नगरसेवकांचे लवकरच प्रशिक्षण घेण्यात येणार असल्याचे अश्रफ आझमी यांनी सांगितले. या प्रशिक्षणामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या नियमावलीसह नगरसेवकांचे कर्तव्य, नगरसेवकांना असलेला हक्क, विविध समित्यांचे कामकाज, त्यांना असलेले अधिकार याबाबत नगरसेवकांना प्राथमिक माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेत अवघे आठ नगरसेवक निवडून आलेल्या एमआयएमचे महत्त्व वाढणार आहे. महापालिकेच्या प्रत्येक प्रमुख समितीवर त्यांचा एक सदस्य असल्यामुळे महायुतीला समित्यांमधील सत्ता चालवणे जड जाऊ शकते.
विविध समित्यांमध्ये पदसिद्ध सदस्यांमुळे महायुतीचे जेमतेम बहुमत असले तरी अनेक ठिकाणी महायुती व विरोधकांच्या सदस्यांची संख्या समान आहे. विशेष म्हणजे विरोधकांची संख्या समान होण्यात एमआयएमचा मोठा वाटा आहे. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार महाविकास आघाडीसोबत एमआयएम राहिल्यास महायुतीला समित्यांमधील सत्ता चालवणे जड जा
महापालिका सभागृहासह विविध समित्यांमध्ये एमआयएमने तटस्थ भूमिका घ्यावी, यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र एमआयएमने अद्यापपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. परंतु एमआयएम ठाकरे बंधूनाही मदत करणार नसल्याचे समजते. त्यामुळे भाजपा शिवसेना महायुतीसाठी ही जमेची बाजू असल्याचे सांगण्यात येत आहे.ऊ शकते.
महापालिकेतील सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीत महायुतीचे 13 तर विरोधकांचे 13 सदस्य राहणार आहेत. त्यामुळे या समितीत बहुमताच्या जोरावर काम करताना अनेक अडचणी येऊ शकतात. यावेळी एमआयएमची मुख्य भूमिका राहणार आहे.