

मुंबई : टाटा मेमोरियल रुग्णालयात स्तनांच्या कर्करोगाच्या तपासणी व निदानासाठी अत्याधुनिक डिजिटल मॅमोग्राफी मशिन सुरू करण्यात आले आहे. ई-टॉमोसिंथेसिस (3 मॅमोग्राफी) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा समावेश असून, त्यामुळे कर्करोगाचे लवकर, जलद आणि अधिक अचूक निदान शक्य होणार आहे.
स्तन कर्करोगाच्या तपासणी व निदान सेवांना अधिक बळकटी देण्यासाठी टाटा मेमोरियल रुग्णालयात एआय अत्याधुनिक डिजिटल मॅमोग्राफी मशिनचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. या नव्या प्रणालीमुळे स्तन कर्करोगाचे लवकर निदान होऊन रुग्णांना वेळेत आणि अधिक प्रभावी उपचार मिळणे शक्य होणार आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता, टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक डॉ. सी. एस. प्रमेश, रेडिओडायग्नोसिस विभागप्रमुख डॉ. सुयश कुलकर्णी यांच्यासह वरिष्ठ प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अत्याधुनिक यंत्रामुळे टाटा मेमोरियल रुग्णालयातील स्तन कर्करोग तपासणी व निदान सेवा अधिक बळकट होणार आहेत. यामुळे लवकर निदान होऊन उपचारांचे परिणाम अधिक चांगले मिळतील.
डॉ. सी. एस. प्रमेश, संचालक, टाटा मेमोरियल रुग्णालय