कुडाळ : पुढारी वृत्तसेवा : कुडाळ तालुक्यात पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर गेले दोन दिवस धुवाँधार पाऊस कोसळत आहे. यामुळे कुडाळ तालुक्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले. तालुक्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली.
अधिक वाचा :
भंगसाळ नदीच्या पूराचे पाणी शहरातील आंबेडकर नगरात आल्याने नागरीकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. गुलमोहर हॉटेल नजिकच्या रस्त्यावर पाणी आल्याने गांधीचौक ते काळपनाका या मार्गावरील वाहतूक ही काहीकाळ ठप्प झाली.
अधिक वाचा :
पंचायत समिती व नवीन बसस्थानकनजिक परप्रांतीयांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरले. तालुक्यात ठिकठिकाणी सखल भागात रस्त्यावर पाणी आले.
कुडाळ, पावशी, वेताळबांबर्डे, पणदूर, अणाव, बांव आदींसह ठिकठिकाणी भातशेतीत पुराचे पाणी शिरून शेतीचे नुकसान झाले.
अधिक वाचा :
तालुक्यात गेले दोन दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे. रविवारी रात्रीपासून तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे तालुक्यातील नद्या, नाले ओसंडून वाहू लागले. माणगांव निर्मला, कुडाळ भंगसाळ (कर्ली), वेताळबांबर्डे हातेरी व हुमरमळा पिठढवळ या नद्यांना पुर येऊन पुराचे पाणी नदीकाठच्या भागात शिरले.
महामार्ग चौपदरीकरण पुलारून अक्षरशः पाण्याचे धबधबे सुरु झाले होते तर आर एस एन नजीक महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. सह्याद्री पट्ट्यात धुवाँधार पडलेल्या पावसाने माणगाव खोर्यातील वाहणारी कर्ली नदी दुधडी भरून वाहू लागली. माणगाव आंबेरी पुलावर सकाळच्या सत्रात काही वेळ पाणी आले होते.
त्या मार्गावरील वाहतूक काही वेळ थांबली. दरम्यान, तालुक्यातील सर्व नदी, नाल्यांची पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली. परिणामी सखल भागात पाणी शिरल्याने शेतकर्यांची काही ठिकाणची लावणीची कामे थंडावली आहेत.
हे ही वाचा :
हे ही पाहा :
मधमाशांनी बनवले दयावानचे आयुष्य मधाळे