Latest

राजू शेट्टी यांच्याऐवजी राष्ट्रवादीकडून हेमंत टकले यांचे नाव?

दीपक दि. भांदिगरे

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या यादीतून माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव वगळण्यात आले आहे. राजू शेट्टी यांच्याऐवजी राष्ट्रवादीकडून हेमंत टकले यांचे नाव देण्यात आल्याचे वृत्त आहे.

राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. पण ते राज्य सरकार विरोधात पदयात्रा काढत आहे. यामुळे त्यांचे नाव वगळण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच तांत्रिक कारणामुळे शेट्टी यांचे नाव वगळले असल्याचेही सांगितले जात आहे.

सरकारने पाठवलेल्या बाराजणांच्या यादीत राष्ट्रवादीकडून राजू शेट्टी यांचे नाव देण्यात आले होते. गेले दहा महिने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या यादीवर कोणताही निर्णय घेतलेला नाही. आता शेट्टी यांच्याऐवजी हेमंत टकले यांचे नाव दिल्याची माहिती पुढे आली आहे.

शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. या यादीवर योग्य निर्णय घेऊ, इतकेच आश्वासन राज्यपालांनी दिले होते.

शेट्टी गेल्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगलेमधून शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्याकडून पराभूत झाले. हाच पराभव राजू शेट्टी यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीत अडसर बनल्याचे सांगितले जाते.

याच निकषावर राजभवनावर गेलेल्या यादीत नाव असलेले प्रा. यशपाल भिंगे आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचीही नियुक्ती अडचणीत येण्याची शक्यता आहे.

यशपाल भिंगे नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून दीड लाखापेक्षा अधिक मतांनी पराभूत झाले होते.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसकडून 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यादेखील पराभूत झाल्या होत्या. यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT