Al Qaeda : अल कायदा जम्मू-काश्मीरमध्ये करणार जिहाद? | पुढारी

Al Qaeda : अल कायदा जम्मू-काश्मीरमध्ये करणार जिहाद?

नवी दिल्ली, पुढारी ऑनालईन : अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानातून गेल्यानंतर दहशतवादी संघटना अल कायदाने (Al Qaeda) इस्लामिक भूमीला मुक्त करण्यासाठी वैश्विक जिहाद करण्याचं आव्हान केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या इस्लामिक भूमीच्या यादीमध्ये पाकिस्तानच्या इशाऱ्यावर काश्मीरचाही समावेश केला आहे. पण, चेचन्या आणि शिनजियांग या भूमीला यादीमधून हटविण्यात आलं आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने आपल्या वक्तव्यामध्ये सांगितलं की, “काश्मीरला यादीमध्ये समाविष्ट करणे, हे पाकिस्तानचे उद्दिष्ट आहे, तालिबानचा नाही. ही खेळी फक्त पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय खेळू शकते. भारतासाठी ही एक मोठी चिंता आहे. अल कायदा (Al Qaeda) जगातील मुस्लिमांना कट्टर बनविण्यासाठी प्रयत्न करत आहे. पाकिस्तान आपल्या एजेंड्याला पुढे सरकवत आहे.”

त्या अधिकाऱ्यांनी पुढे असंही सांगितलं की, “विशेष हे की, तालिबानचा सर्वेसर्वा हा हैबतुल्लाह अखुंदजादा हा पाकिस्तानच्या आयएसएसच्या ताब्यात आहे. अफगाणिस्तानमधील घडामोडींदरम्यान दिल्ली आणि काश्मीर यांच्यामध्ये सातत्याने बैठका होत आहेत. त्यात एलओसीमधील घुसखोरी आणि सक्रिय झालेल्या लाॅन्चपॅड्स यावर चर्चा करण्यात आली. तालिबानी पूर्वीसारख राज्य करतात की, त्यात पूर्वी त्यात काही बदल करतात, यावर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे.”

“विशेष बाब ही की, तालिबानने यापूर्वी काश्मीरबद्दल कोणतीही रुची दाखवलेली नाही. पण, तालिबान जगाला कायम सांगत आला आहे की, आम्ही आमची रणनिती बदललेली नाही. परंतु, वस्तुस्थिती अशी आहे की, हरकत-उल-अंसार, हरकत-उल-मुजाहिद्दीन आणि हरकत-उल-जिहाद इस्लामी यांसारख्या दहशतवादी संघटनांना सहमती दिली आहे”, असंही आंतरराष्ट्रीय राजकारणाचे जाणकार सांगत आहेत.

पहा व्हिडीओ : अफगाणिस्तान : काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले

Back to top button